शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
4
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
5
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
6
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
7
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
8
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
9
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
10
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
11
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
12
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
13
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
14
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
15
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
16
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
17
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
18
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
19
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
20
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ

CoronaVirus : 'भारतातील परिस्थिती विदारक', कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 09:30 IST

CoronaVirus : भारतातील कोरोनाची परिस्थिती विदारक असून यावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मदत केली जात असल्याचे टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देभारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे.

जिनेव्हा : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus)  यांनी सोमवारी भारतातील कोरोना स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. भारतातील कोरोनाची परिस्थिती विदारक असून यावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मदत केली जात असल्याचे टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी म्हटले आहे. (who chief on corona virus crisis said situation in india is beyond heartbreaking)

जागतिक आरोग्य संघटनेकडून जे शक्य आहे, ते सर्व केले जात आहे. महत्वाच्या साधनसामुग्रीचा पुरवठा केला जात आहे, असे टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी सांगितले. तसेच, हजारहून अधिक ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, प्री फेब्रिकेटेड मोबाईल फील्ड हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांचा पुरवठा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. 

("तीन प्रकारात विभागला 'डबल म्यूटेंट' व्हायरस", जाणून घ्या संपूर्ण माहिती...)

याशिवाय, कोरोना संकटाचा सामना करताना आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून २६०० तज्ज्ञ भारतात पाठवण्यात आल्याचेही यावेळी टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी सांगितले. दरम्यान,  भारतातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवर वाढ होत असल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

(Coronavirus : ...म्हणून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला, CSIR नं सांगितलं कारण)

भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात सोमवारी ३ लाख ५२ हजार ९९१ नवे रुग्ण तर २८१२ मृत्यूंची नोंद झाली. ही रुग्णसंख्या जागतिक उच्चांक गाठणारी आहे.

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत