शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

अनिता आनंद, कमल खेरा कोण आहेत? कॅनडा सरकारमध्ये भारतीय वंशाच्या दोन मंत्र्यांची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:09 IST

Kamal Khera Anita Anand, Ministers in Canada Government: दोन महिला मंत्र्यांना मिळाली महत्त्वाची मंत्रालये, जाणून घ्या सविस्तर

Kamal Khera Anita Anand, Ministers in Canada Government: कॅनडा सरकारमध्ये काही काळापासून अस्थिरता होती. त्यानंतर अखेर तेथे सत्तापालट झाला आणि जस्टिन ट्रुडो सरकारचा अंत झाला. आता कॅनडामध्ये लिबरल पक्षाचे नेते मार्क कार्नी यांचे सरकार असून ते कॅनडाचे नवे पंतप्रधान बनले आहेत. शुक्रवारी त्यांनी कॅनडाचे २४वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मार्क कार्नी यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या दोन महिलांचा समावेश करणयात आला आहे. अनिता आनंद आणि कमल खेरा अशी दोघींची नावे आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या मंत्रालयाबद्दल...

कोण आहेत कमल खेरा?

कमल खेरा या मूळच्या दिल्लीच्या आहेत. त्या कॅनडाच्या संसदेत निवडून येणाऱ्या सर्वात तरुण महिलांपैकी एक आहेत. त्यांना सध्याच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. खेरा या पहिल्यांदा २०१५ मध्ये ब्रॅम्प्टन वेस्टमधून खासदार झाल्या. उच्च शालेय शिक्षणासाठी त्या कॅनडाला गेल्या. खेरा या टोरंटो येथील यॉर्क विद्यापीठातून विज्ञान शाखेच्या पदवीधर झाल्या. आरोग्यमंत्री झाल्यानंतर खेरा म्हणाल्या की, एक नर्स म्हणून काम करताना रुग्णांना बरे करणे हेच माझे सर्वोच्च प्राधान्य असते. आरोग्यमंत्री असतानाही मी याच तत्त्वाचा अवलंब करेन.

कोण आहेत अनिता आनंद?

अनिता आनंद यांचे आईवडील दोघेही भारतीय डॉक्टर होते. ६० च्या दशकाच्या सुरुवातीला, त्यांचे पालक नायजेरियात राहत होते. अनिता आनंद यांचा जन्म २० मे १९६७ रोजी त्याच देशातील नोव्हा स्कॉशियामध्ये झाला. ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर ५८ वर्षीय अनिता आनंद यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते. पण जानेवारी महिन्यात त्यांनी माघार घेतली. सध्या त्या नव्या सरकारमध्ये विज्ञान आणि उद्योग मंत्रालयाचा कारभार पाहत आहेत. अनिता या सर्वप्रथम २०१९ मध्ये ओकव्हिलमधून संसद सदस्य म्हणून निवडून आल्या. कार्नी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर अनिता म्हणाल्या की, कॅनडा एकजूट आणि मजबूत आहे. कॅनेडियन अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आपण कामाला लागूया. 

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडाministerमंत्रीJustin Trudeauजस्टीन ट्रुडो