व्हाइट हाउसची सुरक्षा करणारे कुत्रे आता काझिरंगात देणारा पहारा
By Admin | Updated: July 10, 2017 00:40 IST2017-07-10T00:40:34+5:302017-07-10T00:40:34+5:30
काझिरंगात वन्यजीव संरक्षण आणि शिकार विरोधी मोहिमेत या कुत्र्यांचा उपयोग करण्यात येणार आहे.

व्हाइट हाउसची सुरक्षा करणारे कुत्रे आता काझिरंगात देणारा पहारा
गुवाहाटी : अतिशय चपळ आणि भेदक नजरेचे हे बेल्जियम मॅलिनोइस कुत्रे लवकरच काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात पहारा देणार आहेत. अमेरिकेतील व्हाइट हाऊसची सुरक्षा करणाऱ्या सील टीमचा ते एक भाग आहेत. काझिरंगात वन्यजीव संरक्षण आणि शिकार विरोधी मोहिमेत या कुत्र्यांचा उपयोग करण्यात येणार आहे. अलीकडच्या काळात येथे वन्यजीवांची तस्करी वाढली आहे. त्यामुळे चार बेल्जियम मॅलेनोइस कुत्र्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. अज्ञातस्थळी या कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हिवाळा सुरू होईपर्यंत ते संरक्षणासाठी सज्ज असतील. या कुत्र्यांसाठी एक विदेशी प्रशिक्षकही असणार आहे. स्फोटके आणि अमली पदार्थ शोधून काढण्याचे कसबही या कुत्र्यांमध्ये आहे.