...जेव्हा सचिनची शेवटची बस मिस होते
By Admin | Updated: July 13, 2015 18:12 IST2015-07-13T18:07:30+5:302015-07-13T18:12:39+5:30
शेवटची ट्रेन किंवा बस मिस होण्याचा अनुभव अनेकांनी घेतला असला तरी लंडनमध्ये खुद्द सचिन तेंडुलकरलाही शेवटची बस चुकल्याने बस स्टॉपवर ताटकळत उभे राहावे लागले.

...जेव्हा सचिनची शेवटची बस मिस होते
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १३ - शेवटची ट्रेन किंवा बस मिस होण्याचा अनुभव अनेकांनी घेतला असला तरी लंडनमध्ये खुद्द सचिन तेंडुलकरलाही शेवटची बस चुकल्याने बस स्टॉपवर ताटकळत उभे राहावे लागले. शेवटी सचिनने ट्विटर व इन्स्टाग्रामवर कोणी लिफ्ट देईल असा संदेश टाकला व त्याला चाहत्यांनी भरभरु प्रतिसाद दिला.
सचिन तेंडुलकर सध्या लंडनमध्ये असून विम्बल्डनमध्ये प्रेक्षक गॅलरीत सचिनची उपस्थिती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. विम्बल्डन पार पडल्यावर सचिन ऑक्सफोर्डशायर येथे फिरायला गेला होता. मात्र तिथून परतत असताना सचिनची शेवटची बस चुकली. सचिनने इन्स्टाग्राम व ट्विटरवर बस स्टॉपवरील त्याचा फोटो शेअर करत 'मला कोणी लिफ्ट देऊ शकेल का?' असा संदेश टाकला. सचिनच्या या ट्विटला चांगलाच प्रतिसाद मिळाला. सचिनच्या या ट्विटला ५०० हून अधिक चाहत्यांन रिट्विट केले तर काही जणांनी या ट्विटवरुन विनोदही केले. सचिन तिथून सुखरुप परतला असला तरी तो कसा आला हे मात्र समजू शकलेले नाही.