भारतात लिंबू -मिरचीचा वापर खाद्यपदार्थांशिवाय जादूटोण्यासाठीही केला जातो. अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे प्रायोगिक अंतराळ यान अनेक संकटात सापडले होते. त्याचे कमांडर गस ग्रिशम यांचा जादूटोण्यावर थोडा विश्वास होता. या विश्वासापोटीच त्यांनी अंतराळयानाच्या मोड्युलबाहेर लिंबू लटकविले होते.
‘नासा’चा नियमचंद्रावरून पृथ्वीवर आणण्यात आलेल्या माती, खडक व इतर वस्तूंच्या नमुन्यांबाबत ‘नासा’ने तयार केलेल्या नियमावलीनुसार चंद्राशी संबंधित सर्वच वस्तू ह्या अमेरिकेची संपत्ती असतील आणि त्यांचा वापर केवळ सरकारी उद्देशांसाठीच केला जाऊ शकतो.अमेरिका आणि चीननंतर भारतानेसुद्धा चांद्र मोहिमेच्या दिशेने वेगवान पावले टाकणे सुरू केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे(इस्रो) अंतराळ मोहीम चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच चीनने आपले अंतराळ यान चांग ई-४ चंद्रावर उतरविले आहे. अपोलो-१७ नंतर अमेरिकेने चंद्रात रुची घेणे बंद केले होते. परंतु आता तोसुद्धा पुन्हा चंद्रावर संशोधनात गुंतला आहे. इ.स. २०२४ पर्यंत चंद्रावर पुन्हा एकदा अमेरिकेच्या अंतराळवीरांची पावले पडू शकतात. चंद्रावर वसाहती निर्माण करून खनिजांचे उत्खनन आणि मोठे उद्योग उभारण्यासाठी ही सगळी चढाओढ आहे. चंद्रावर वस्त्या निर्माण करून खनिज पदार्थांचे उत्खनन करण्याची जगभरातील महाशक्तींची योजना आहे. हे लक्षात घेऊनच चीन, अमेरिका, रशिया आणि भारत प्रदीर्घ कालावधीच्या योजनेवर काम करीत आहे. इ.स. २०३६ पर्यंत चंद्रावर आपला एक स्थायी ठावठिकाणा असावा यासाठी चीन प्रयत्नशील आहे. अग्निबाण बनविण्यासाठी चंद्राच्या भूपृष्ठावर आढळणाऱ्या टायटेनियम, युरेनियम, पोलाद व पाण्याचा वापर करण्याची या देशाची मनीषा आहे.