शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्या टॅरिफचा भारतावार काय परिणाम होणार? गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:14 IST

"याचे (टॅरिफ) परिणा निर्धारित करणे सध्या घाईचे होईल. टॅरिफचा सामना करणारा भारत हा काही एकमेव देश नाही."

सध्या संपूर्ण जगभरात अमेरिकेने सुरू केलेल्या टॅरिफ वॉरची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील निर्णयाने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. यातच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी (9 एप्रिल 2025) यासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, "बाहेरील दबावामुळे भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही. संपूर्ण जगभरात अनिश्चिततेचे वातावरण असतानाच आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे. ती अशा प्रकारच्या दबावाचा सामना करण्यास सक्षम आहे." शाह दिल्ली येथे 'रायझिंग इंडिया समिट' मध्ये बोलत होते. 

शाह पुढे म्हणाले, "याचे (टॅरिफ) परिणा निर्धारित करणे सध्या घाईचे होईल. टॅरिफचा सामना करणारा भारत हा काही एकमेव देश नाही. अनेक देश टॅरिफचा सामना करत आहेत. कदाचित आपला माल इतर देशांमध्येही निर्यात केला जाऊ शकतो."

शाह पुढे म्हणाले, "अमेरिकन टॅरिफ एक जटिल मुद्दा आहे. याच्या परिणामांचे घाईगडबडीने निर्धारण करणे योग्य नाही. भारताची अर्थव्यवस्था लवचिक आहे. यामुळे अशा प्रकारच्या बाहेरील दबावामुळे भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाहीत. 

अमेरिकेसोबत चर्चा करेल भारत - पीयूष गोयलतत्पूर्वी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, भारत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफमधून सूट मिळवण्यासाठी अमेरिकेसोबत चर्चा करेल. भारताने या वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिकेसोबत  द्विपक्षीय व्यापार करार (BTA) करण्यास सहमती दर्शवली आहे.

लवकरच चर्चा होईल अन्..., काय म्हणाले जयशंकर? -एका खाजगी टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी पहिल्यांदाच अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयावर थेट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, इतक्यात अमेरिकन शुल्काच्या परिणामाचे मूल्यांकन करणे फार घाईचे ठरेल. परंतु भारताने वर्षाच्या अखेरीस अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करार (BTA) करण्याची धोरणात्मक योजना आखली आहे. जयशंकर पुढे म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेसोबत व्यापार करारासाठी तत्वतः करार करणारा भारत हा कदाचित एकमेव देश आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की, या मुद्द्यावर ट्रम्प प्रशासनाशी लवकरच चर्चा केली जाईल आणि या वर्षाच्या अखेरीस बीटीएवरील चर्चा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

प्रतिक्रिया देण्याची घाई नकोजयशंकर यांनी असेही नमूद केले की, भारताने या प्रकरणावर अतिशय संतुलित आणि विचारशील प्रतिसाद दिला आहे. त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय होईल, हे आम्हाला अद्याप माहित नाही. त्यामुळेच आम्ही घाईघाईने त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. आम्ही ठोस चर्चा आणि कराराकडे वाटचाल करत आहोत, असेह त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतTrade Tariff Warटॅरिफ युद्ध