शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 16:14 IST

इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने केलेल्या ताज्या हल्ल्यांसंदर्भात पाकिस्तानने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हे हल्ले आधीच सुरू असलेल्या इस्रायली कारवायांचाच भाग आहेत...

अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर मोठे हल्ले चढवत ते उद्ध्वस्त केले आहेत. अमेरिकेच्या या हल्यानंतर, पाकिस्तानातील परराष्ट्र मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी करत, अमेरिकेकडून करण्यात आलेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. एवढेच नाही तर, इराणच्या सार्वभौमत्वावर करण्यात आलेला हा हल्ला प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी गंभीर धोका असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे.

हमल्ल्याने वाढू शकतो तणाव -इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने केलेल्या ताज्या हल्ल्यांसंदर्भात पाकिस्तानने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हे हल्ले आधीच सुरू असलेल्या इस्रायली कारवायांचाच भाग आहेत. यामुळे संबंधित प्रदेशात तणाव आणि हिंसाचार आणखी वाढू शकतो, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, ही परिस्थिती केवळ मध्यपूर्वच नव्हे तर संपूर्ण जगाच्या शांतता आणि स्थिरतेसाठी धोकादायक आहे, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

इराणला स्व-संरक्षणाचा अधिकार - पाकिस्तानने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, या हल्ल्यांने आंतरराष्ट्रीय कायद्याचे तथा संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमधील सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. इराणला स्व-संरक्षणाचा अधिकार आहे आणि त्याच्यावरील असे हल्ले कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाहीत. हे आंतरराष्ट्रीय नियमांविरोधातील एक धोकादायक पाऊल आहे.

विद्यमान संकटाचा मार्ग केवळ चर्चा आणि कूटनीतीतूनच सुटू शकतो -आपल्या निवेदनात, पाकिस्तानने सर्व देशांना सामान्य नागरिकांच्या जीविताचा आणि मालमत्तेचा आदर करण्याचे आणि युद्धासारख्या कारवाया तत्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे. या शिवाय, सर्व पक्षांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे, प्रामुख्याने मानवाधिकार कायद्याचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, विद्यमान संकटाचा मार्ग केवळ चर्चा आणि कूटनीतीतूनच सुटू शकतो. यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे पालन करणे आवश्यक आहे, यावरही पाकिस्तानने जोर दिला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाIranइराण