अंतराळ प्रवास करणाऱ्यांच्या अनुवांशिकतेवर परिणाम?
By Admin | Updated: January 30, 2017 00:40 IST2017-01-30T00:40:19+5:302017-01-30T00:40:19+5:30
अंतराळात प्रवास केल्याचा परिणाम अंतराळवीराच्या अनुवांशिकतेवर आणि जीवशास्त्रविषयक होऊ शकतो, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) अभ्यासात म्हटले आहे.

अंतराळ प्रवास करणाऱ्यांच्या अनुवांशिकतेवर परिणाम?
वॉशिंग्टन : अंतराळात प्रवास केल्याचा परिणाम अंतराळवीराच्या अनुवांशिकतेवर आणि जीवशास्त्रविषयक होऊ शकतो, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) अभ्यासात म्हटले आहे. यासाठी जुळ््या भावंडांचा अभ्यास करण्यात आला. अंतराळवीर स्कॉट केली यांचा आणि त्यांचा जुळा भाऊ मार्क याच्या गुणसूत्रांमध्ये काय काय फरक पडतो याचा शास्त्रज्ञांनी केला. स्कॉट हे जवळपास वर्षभर अंतराळात होते.
स्कॉट केली यांची अंतराळ मोहीम सुरू व्हायच्या आधी, मोहिमेत आणि मोहिमेनंतर मोजमापे घेण्यात आली होती. त्यात अनुवांशिकतेवर, डीएनए मिथेलेशन आणि जीवशास्त्रविषयक चिन्हांमध्ये बदल झाल्याचे आढळले. या बदलांचे श्रेय हे त्यांनी अंतराळात जो काळ घालवला त्याला दिले जाऊ शकते. स्कॉट आणि मार्क या जुळ््या भावांच्या आतड्यांतील क्रोमोसोमसपासून ते मायक्रोबायोमेसपर्यंतच्या उंचीमध्ये आम्हाला फरक जाणवला, असे जवळपास सगळ््यांनी म्हटले, असे न्यूयॉर्कमधील विईल कॉर्नेल मेडिसीनमधील अनुवंशशास्त्रज्ञ ख्रिस्तोफर मॅसन यांनी सांगितले. जे बदल झाल्याचे दिसले ते अंतराळ प्रकाशामुळे किती आणि नैसर्गिक तफावतीमुळे किती हे शोधून काढणे हे मोठे आव्हान आहे. स्कॉट केली आणि मार्क केली हे जुळे भाऊ असून त्यांच्याबाबतीत सांगण्यात आलेले बदल हे सरसगट सगळ््यांच्याबाबतीत घडू शकतीलच, असे नाही, असे संशोधकांनी म्हटले आहे.
अभ्यासाचे हे काम खूप तपशिलाने नोंदवून ठेवण्यात आले असून ते तसे पूर्वी कधी झालेले नव्हते व या अभ्यासासाठी खूप प्रतिकूल वातावरणात काम करावे
लागलेले आहे.