शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

अमेरिकन नागरिक असलेल्या सज्ञान मुलीला जॉईन करण्याची प्रक्रिया काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 01:17 IST

तुमच्या मुलीकडे जाण्यासाठी प्रथम तुम्हाला व्हिसासाठीची प्रक्रिया सुरू करावी लागेल.

प्रश्न- माझी सज्ञान मुलगी अमेरिकची नागरिक आहे. माझे पती आणि मी कायदेशीर तिला कसे जॉईन करू शकतो?

उत्तर: तुम्ही अमेरिकेत असलेल्या तुमच्या मुलीला ज़ईन होण्याचा निर्णय घेतलात, त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. तुमच्या मुलीकडे जाण्यासाठी प्रथम तुम्हाला व्हिसासाठीची प्रक्रिया सुरू करावी लागेल.तुमच्या सज्ञान (२१ वर्षांवरील) अमेरिकन नागरिक असलेल्या मुलीनं, म्हणजेच अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अर्जदारानं युनायटेड स्टेट्स सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडे (यूएससीआयएस) फॉर्म आय-१३० 'पिटिशन फॉर एलियन रिलेटिव्ह' दाखल करायला हवा. इलेक्ट्रॉनिकली किंवा पारंपरिक कागदोपत्री ही प्रक्रिया करता येते. पुढील टप्प्यावर जाण्यापूर्वी यूएससीआयएसनं सुरुवातीचा अर्ज मंजूर करायला हवा. प्रक्रियेच्या कालावधीबद्दलच्या माहितीसाठी यूएससीआयएसशी संपर्क साधा.

यूएससीआयएसनं तुमचा अर्ज मंजूर केल्यावर डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स नॅशनल व्हिसा सेंटर अर्जदाराशी संपर्क साधतं. त्यानंतर अर्जदाराला शुल्क भरावं लागतं, इमिग्रंट व्हिसा इलेक्ट्रॉनिक अर्ज भरून कागदपत्रं जमा करावी लागतात. त्यामध्ये जन्मदाखला, लग्न प्रमाणपत्र आणि घटस्फोट किंवा माजी पती/पत्नीच्या मृत्यू प्रमाणपत्राचा समावेश होतो.

यासोबत तुमची मुलगी (किंवा जॉईंट स्पॉन्सर असलेल्या दुसऱ्या कोणीतरी) आय-८६४ शपथपत्र सादर करावं. तुम्ही अमेरिकेत आल्यावर ते तुम्हाला आर्थिक मदत करतील हे दाखवण्यासाठी त्यांनी सोबत अलीकडची कर कागदपत्रं सोबत जोडावीत.

तुम्ही कागदपत्रं जमा केल्यावर आणि ती मंजूर झाल्यावर, एनव्हीसी ती अमेरिकेच्या दूतावासाला किंवा वकिलातीला पाठवून देतात. दूतावासाकडे किंवा वकिलातीकडे एकदा तुमची केस आल्यावर तुम्ही मुलाखतीसाठी अपॉईंटमेंट शेड्युल करू शकता आणि आवश्यक असलेल्या वैद्यकीय चाचणीसाठी आमच्या पॅनलवरील फिजिशियनशी संपर्क साधू शकता. तुम्ही तसं आधीच केलं नसल्यास https://cac.state.gov/ceac/ वर जाऊन तुम्हाला इलेक्ट्रॉनिक अर्ज दाखल करावा लागेल. तुम्हाला तुमचा वैध पासपोर्ट आणि सर्व आधीचे सर्व पासपोर्ट, पांढरा बॅकग्राऊंड असलेले दोन 2x2 इंचाचे (51x51 मिमी) कलर फोटोग्राफ आणि प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयानं दिलेलं भारतीय पोलीस प्रमाणपत्र आणावं लागेल. (सूचना: तुम्ही वयाची १६ वर्षे पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या देशात वास्तव्यास केलं असल्यास, तुम्हाला त्या देशातील पोलीस प्रमाणपत्रंदेखील जमा करावं लागू शकतं.) कागदपत्रं गोळा करून झाल्यावर, तुम्ही http://www.ustraveldocs.com/in वर जाऊन तुमचे फोटोग्राफ आणि फिंगरप्रिंट सबमिट करण्यासाठी भारतातील व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर्सपैकी एकाची अपॉईंटमेंट शेड्युल करू शकता. त्यानंतर तुम्ही अमेरिकेच्या दूतावासात किंवा वकिलातीत मुलाखत देण्यास तयार आहात.

ही प्रक्रिया पूर्ण झाली याचा अर्थ तुम्हाला खात्रीपूर्वक व्हिसा मिळेलच असं नाही. अमेरिकेच्या दूतावासातील किंवा वकिलातीमधील मुलाखत घेणारा अधिकारी याबद्दलचा अंतिम निर्णय घेतो. मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यानं व्हिसा जारी केल्यास, तो तुम्हाला आठवड्याभरात मिळेल. त्यानंतर तुम्ही अमेरिकेला जाऊन तुमच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊ शकता. 

याबद्दल आवश्यक असलेल्या गोष्टी बदलत असल्यानं लेटेस्ट माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचे ऑनलाईन रिसोर्सेस चेक करू शकता. उदाहरणार्थ, कोविड-१९ लसीकरण आता आमच्या वैद्यकीय परिक्षेचा एक आवश्यक भाग आहे. याबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा इमिग्रंट व्हिसा प्रक्रियेबद्दल इतर माहिती जाणून घेण्यासाठी कृपया https://travel.state.gov/content/visas/english/immigrate.html या संकेतस्थळाला भेट द्या.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य  ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा