अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर होऊन काही तास उलटत नाहीत तोच, इराणच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या तेल तळांवर भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी इराणमधील लावन रिफायनरी आणि सिर्री बेट येथे एकापाठोपाठ एक स्फोट झाले. या घटनेमुळे मिडल ईस्टमध्ये पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत.
इराणची अधिकृत वृत्तसंस्था 'मेहर'ने दिलेल्या माहितीनुसार, लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये बुधवारी सकाळी अनेक मोठे स्फोट झाले. त्यानंतर काही वेळातच सिर्री बेटावरूनही स्फोटांचे आवाज ऐकू आले. हे दोन्ही भाग इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीसाठी आणि साठवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. हे स्फोट नेमके कशामुळे झाले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र रिफायनरीमधून धुराचे मोठे लोळ आकाशात दिसत आहेत.
दुसरीकडे कुवेतवर ड्रोन हल्ला झाला आहे. कुवेत सरकारने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हा हल्ला इराणच्या बाजूने करण्यात आल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे नुकतीच सुरू झालेली शांतता चर्चा धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
इराणचा 'जशास तसे' उत्तर देण्याचा इशाराया स्फोटांनंतर इराणच्या सशस्त्र दलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "सर्व पक्षांनी युद्धविरामाचे पालन करणे आवश्यक आहे. इराणवर कोणत्याही प्रकारचे आक्रमण झाल्यास त्याचे प्रत्युत्तर अत्यंत वेदनादायक आणि जोरदार दिले जाईल," असा इशारा इराणने दिला आहे. या स्फोटांमागे कोणाचा हात आहे, हे अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.
ट्रम्प यांची भूमिका आणि सीझफायरडोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारीच इराणसोबतच्या १४ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली होती. इराणने मांडलेला १० कलमी प्रस्ताव मान्य करत शांततेच्या दिशेने पाऊल उचलले होते. मात्र, लावन आणि सिर्री बेटावरील या स्फोटांमुळे ट्रम्प प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इराणने 'होर्मुझची सामुद्रधुनी' खुली करण्याचे मान्य केल्यावर हे स्फोट होणे, हा मोठा कट असल्याची चर्चा संरक्षण तज्ज्ञांमध्ये सुरू झाली आहे.
Web Summary : Shortly after a ceasefire between the US and Iran, explosions rocked Iran's Lavan refinery and Sirri Island. These key oil export and storage locations are now under suspicion of attack, raising fears of renewed conflict despite peace talks.
Web Summary : अमेरिका और ईरान के बीच संघर्षविराम के तुरंत बाद, ईरान की लावन रिफाइनरी और सिर्री द्वीप में विस्फोट हुए। प्रमुख तेल निर्यात और भंडारण स्थलों पर हमलों के संदेह से शांति वार्ता के बावजूद संघर्ष के नवीनीकरण का डर बढ़ गया है।