शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 13:15 IST

What Is Poseidon: रशियाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या 'पोसायडॉन' नावाच्या महाकाय टॉर्पेडोची यशस्वी चाचणी केली. 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २९ ऑक्टोबर रोजी जगाला हादरवणारी एक मोठी घोषणा केली. रशियाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या 'पोसायडॉन' नावाच्या महाकाय टॉर्पेडोची यशस्वी चाचणी केली. हे पाण्याखालील अणुशस्त्र आहे. पुतिन यांनी त्याचे वर्णन 'जगात अतुलनीय' असे केले असून, ते रशियाच्या आयसीबीएम क्षेपणास्त्रापेक्षाही अधिक शक्तिशाली आहे.

या अणुशस्त्राला 'विनाशाचा टॉर्पेडो' म्हटले जाते. पोसायडॉन हे रशियाच्या अणुशक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी डिझाइन केलेले आणि अमेरिकेसारख्या देशांच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना भेदण्यासाठी त्याची रचना करण्यात आली. पोसायडॉन हे एक प्रकारचे ड्रोन आहे, जे समुद्रात लांब अंतर प्रवास करू शकते. हे अणुशस्त्र पाणबुडीतून सोडले जाते आणि अणु इंजिनद्वारे चालवले जाते. हे अणुशस्त्र हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट शक्तिशाली आहे, असा दावा केला जात आहे.

पोसायडॉनची खासियत

लांबी: अंदाजे २४ मीटर (मोठ्या बस इतकी लांब).रुंदी: २ मीटर.वजन: अंदाजे १०० टन.वेग: ताशी १८५ किलोमीटर पाण्याखाली. हे इतके वेगवान आहे की सामान्य नौदल ते पकडू शकणार नाही.खोली: १,००० मीटरपर्यंत डुबकी मारू शकते. रेंज: अणुऊर्जेद्वारे चालवले जाणारे, ते महिनोनमहिने समुद्रात फिरू शकते. १४,००० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करू शकते.वॉरहेड: २ मेगाटन अणुबॉम्ब (हिरोशिमा बॉम्बपेक्षा १०० पट जास्त शक्तिशाली)नेव्हिगेशन: जीपीएस आणि स्वायत्त प्रणाली वापरून स्वतःचा मार्ग शोधते.

रशियाने अमेरिकेसारख्या देशांच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना रोखण्यासाठी त्याची रचना केली. हे शस्त्र २०१५ पासून विकसित केले जात आहे. पुतिन यांनी पोसायडॉनच्या यशस्वी चाचणीला मोठी उपलब्धी म्हटले आहे. याआधी रशियाने'बुरेव्हेस्टनिक' क्षेपणास्त्राची चाचणी देखील केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Russia's Poseidon: 100 Times More Powerful Than Hiroshima Bomb

Web Summary : Russia successfully tested Poseidon, a nuclear-powered underwater drone, exceeding Hiroshima's bomb power by 100 times. Designed to breach missile defenses, it travels long distances autonomously, posing a significant threat with its massive warhead and advanced navigation.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन