शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! कोर्टात पुरावा म्हणून चक्क माकड आणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 10:06 IST

‘एक बंदर, होटल के अंदर’ हा हॉलिवूडचा धमाल हिंदी डब सिनेमा अनेकांना आठवत असेल.

कराची : ‘एक बंदर, होटल के अंदर’ हा हॉलिवूडचा धमाल हिंदी डब सिनेमा अनेकांना आठवत असेल. आता मात्र ‘एक बंदर, कोर्ट के अंदर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानमधील कराचीमध्ये १४ माकडांच्या पिल्लांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. यानंतर शुक्रवारी ते न्यायालयात हजर झाले असता पुरावा म्हणून सादर केलेले माकड तेथून पसार झाले आणि थेट परिसरातील झाडावर चढले. अर्थातच न्यायालयीन कर्मचाऱ्यांना हा पुरावा परत मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागली.

सिंधच्या वन्यजीव विभागाचे प्रमुख जावेद माहेर यांनी सांगितले की, ज्या टोपल्यांमध्ये सामान्यतः आंबे पाठविले जातात त्या टोपल्यांमध्ये माकडांची वाहतूक अत्यंत खराब स्थितीत केली जात होती. हे क्रेट्स बॉक्समध्ये बंद करून ठेवण्यात आले होते. या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने सर्व तस्करांना एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला. याशिवाय सर्व माकडांना कराची प्राणीसंग्रहालयात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जंगलात सोडा...

 माकडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठविण्याची मागणी विभागाने न्यायालयाला केली. माकडांची ही पिल्ले खैबर पख्तुनख्वा जवळच्या जंगलातून पकडण्यात आली होती.चीनला लंकेकडून एक लाख माकडे हवी कशाला?

चीनने काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेकडे एक लाख माकडांची मागणी केली होती. श्रीलंकेचे कृषिमंत्री महिंद्र अमरवीरा यांनी १२ एप्रिल रोजी सांगितले होते की चीनने त्यांच्याकडे १००० संग्रहालयांसाठी एक लाख माकडे मागितली होती. 

यावर पर्यावरणावर काम करणारे जगथ गुणवर्देना यांनी संशय व्यक्त करून चीनला ही माकडे संशोधन किंवा खाण्यासाठी तर पाहिजे नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके