शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

झोप आणि आत्महत्येचे ‘कनेक्शन’ तरी काय?, सतत टीव्ही-मोबाइल पाहण्यामुळे मुलांवर गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 07:18 IST

जगभरातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील १ लाख २० हजारांहून अधिक मुलांचा यात अभ्यास करण्यात आला.

सिॲटल : सध्या अनेक लहान मुले सतत टीव्ही, मोबाइल पाहत असून, त्याचा त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होत आहे. कोवळ्या वयात अधिक वेळ टीव्ही, मोबाइलवर घालवल्याने त्यांची झोप उडाली असून, मानसिक आरोग्यही बिघडत चालले असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेतील सिॲटल शहरात वॉशिंग्टन विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, अमेरिकेतील तब्बल ४२ टक्के लहान मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. त्यांना अतिशय कमी झोप मिळत आहे. जगभरातही अशीच स्थिती आहे. १० ते १२ वर्षे वयोगटातील अनेक मुले मोबाइलवर अधिक वेळ घालवत आहेत. त्यामुळे या मुलांचे मानसिक आरोग्य सुस्थितीत आणण्याचे मोठे आव्हान पालकांसमोर निर्माण झाले आहे.

जगभरातील ६ ते १८ वर्षे वयोगटातील १ लाख २० हजारांहून अधिक मुलांचा यात अभ्यास करण्यात आला. संशोधनानुसार कमी झोप आणि सोशल मीडिया आणि व्हिडीओ गेम्सवर जास्त वेळ घालवल्याने नैराश्य आणि तणाव वाढू लागला आहे.सिॲटल चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये मी मुलांच्या झोपेच्या आजारांचा अभ्यास होता. आमची टीम टीव्ही, मोबाइल आणि सोशल मीडियावर घालवलेल्या अतिवेळाच्या नकारात्मक परिणामांचे निरीक्षण करते. याचा परिणाम केवळ झोपेसह शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही होतो, असे संशोधनाचे प्रमुख एम. लिन चेन यांनी म्हटले आहे.

कमी झोप घ्याल तर...मानसिक आरोग्य आणि झोप हे परस्परांशी जोडले गेले आहे. कमी झोपेमुळे मानसिक आरोग्य बिघडते. याचवेळी मानसिक आरोग्य बिघडल्यास झोप उडते. यावर औषधोपचारानेही फरक पडत नाही. सतत झोपेची कमतरता आत्महत्येच्या विचारांचा धोका वाढवत असल्याचा इशारा अभ्यासात देण्यात आला आहे.

मुले काय करतात?अभ्यासात असेही दिसून आले आहे, की आठवड्यात फक्त एक तास कमी झोप घेतल्यास उदासीनता वाटणे, आत्महत्येचा गंभीरपणे विचार करणे आणि अमली पदार्थांचा वापर करण्याचे प्रमाण वाढू शकते.  जेव्हा मुले झोपत नाहीत, त्यावेळी ती स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवतात.

टीव्ही, मोबाइल, सोशल मीडियाने लावलेय वेडसोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत. मात्र, संशोधनानुसार, सोशल मीडिया वापरण्याचे फायदे कमी आणि तोटे अधिक दिसून येत आहेत. सोशल मीडियावर सक्रिय राहण्यामुळे झोपेचे चक्र बिघडून जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्य