वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ:यात न्यूयॉर्क येथे होणा:या स्वागत समारंभात प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन पॉप स्टार अंजली रणदिवे, पाश्र्वगायिका कविता सुब्रमणियम आणि व्हायोलनिस्ट एल. सुब्रमणियम कार्यक्रम सादर करतील.
28 सप्टेंबर रोजी मोदी यांचे मेडिसन स्क्वेअरमध्ये बहुप्रतीक्षित भाषण होणार आहे. त्याआधी अंजली रणदिवे ही अमेरिकेचे तर कविता सुब्रमणियम राष्ट्रगीताचे गायन करील. इंडियन अमेरिकन कम्युनिटी फाऊंडेशनने आयोजन केले आहे.