शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

लग्नातली भेट अजून सांभाळली! बायडेन आता कधीच चालवू शकणार नाहीत Corvette कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 12:17 IST

Joe Biden News: जो बायडेन यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. आता त्यांना त्यांच्या सर्व कार, वाहने अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस एजन्सीकडे सोपवावी लागणार आहेत.  

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. सर्वात मोठा त्याग म्हणजे खासगी आयुष्याचा. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पायउतार झाल्यानंतरही पुढील आयुष्यात कधीही एकटा फिरू शकत नाही. महत्वाचे म्हणजे अमेरिकेची भक्कम सुरक्षा यंत्रणा त्यांना तसे फिरूच देणार नाही. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनादेखील असाच त्याग करावा लागणार आहे. 

जो बायडेन यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. आता त्यांना त्यांच्या सर्व कार, वाहने अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस एजन्सीकडे सोपवावी लागणार आहेत.  यामध्ये त्यांना लग्नात भेट मिळालेली, सर्वात आवडती शेवरोले कंपनीची  Chevy Corvette convertible Stingray (चेवी कॉर्वेट कन्वर्टिबल स्टिंग्रे) कारची चावीदेखील सिक्रेट सर्व्हिसला द्यावी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे ही कार 1967 मध्ये बनविण्यात आली होती. ती त्यांनी तेव्हापासून आजतागायत चकचकीत ठेवली आहे. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी अभेद्य कार दिलेली असते. राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत ते त्याच कारमधून फिरतात. डोनाल्ड ट्रम्प गुजरात दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांच्या कारची वैशिष्ट्य़े आपण पाहिलीच. आता ट्रम्पही एकट्याने कुठेही फिरू शकत नाहीत. त्यांच्यासाठीही तेलढीच तगडी सुरक्षा दिली जाणार आहे. सिक्रेट सर्व्हिस आपल्या कमांडरला कोणत्याही अन्य़ गाडीने कधीच फिरू देत नाहीत. जो बायडेन त्यांचा कार्यकाळ संपला तरीही ते त्यांची आवडीची कार्वेट कार चालवू शकणार नाहीत. अमेरिकेचा कोणताही माजी राष्ट्राध्यक्ष खुल्या रस्त्यावर कार चालवू शकत नाही. बायडेन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्यांना कार चालवायला खूप आवडते. 

बायडन सांगतात, ''मला ही कार खूप आवडते. या कारसोबत माझ्या अविश्वसनीय आठवणी जोडलेल्या आहेत. जेव्हा मी या कारमध्ये बसतो तेव्हा मला माझे वडील आणि मुलगा ब्यू आठवतो. देवा, माझे वडील ही कार चालवू शकतात का?'' बायडेन यांच्या मुलाचे, ब्यू यांचे 2015 मध्ये ब्रेन ट्युमरमुळे निधन झाले होते. बायडेन यांना ही कार त्यांच्या वडिलांनी लग्नावेळी भेट दिली होती. एका टीव्ही शोमध्ये बायडेन यांनी याचा किस्सा सांगितला होता. 5,600 डॉलरला तेव्हा ही कार त्यांच्या वडिलांनी घेतली होती. 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनChevroletशेवरोलेAmericaअमेरिकाcarकार