शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"...बर्दाश्त नही करेंगे"; इस्रायल, डोनाल्ड ट्रम्प यांना सौदी अरेबियाची खुली धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:21 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी एक धक्कादायक विधान केले होते. यात, अमेरिका युद्धात उद्धवस्त झालेल्या गाझा पट्टीवर कब्जा करेल आणि तिचा आर्थिक पुनर्विकास करेल, असे म्हटले होते. ही घोषणा त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत एका संयुक्त पत्रकार परिषदेत केली होती...

पॅलेस्टाइन राज्याच्या स्थापनेशिवाय आपण इस्रायलसोबत कुठलेही संबंध प्रस्थापित करणार नाही, असे सौदी अरेबियाने बुधवारी (5 फेब्रुवारी) एका निवेदनातून स्पष्ट केले आहे. महत्वाचे म्हणजे, सोदीची ही प्रितिक्रिया अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानानंतर आली आहे. आता सौदी अरेबिया पॅलेस्टिनी राज्याची मागणी करत नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी एक धक्कादायक विधान केले होते. यात, अमेरिका युद्धात उद्धवस्त झालेल्या गाझा पट्टीवर कब्जा करेल आणि तिचा आर्थिक पुनर्विकास करेल, असे म्हटले होते. ही घोषणा त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत एका संयुक्त पत्रकार परिषदेत केली होती. एवढेच नाही तर, पॅलेस्टिनी नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी वसवल्यानंतर, अमेरिका गाझावर आपले नियंत्रण प्रस्थापित करेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले होते.

सौदीची कडक भूमिका -रॉयटर्सच्या वृत्तानंतर, ट्रम्प यांच्या या विधानानंतर, सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचीही प्रतिक्रिया आली आहे. सौदीने म्हटले आहे की, "युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी स्पष्टपणे राज्याच्या स्थितीची पुष्टी केली आहे. सौदी अरेबियाची भूमिका ठाम आहे आणि पॅलेस्टिनींना त्यांच्या भूमीवरून विस्थापित करण्याचा कोणताही प्रयत्न सौदी अरेबिया स्वीकारणार नाही."

निवेदनात म्हणण्यात आले आहे की, "सौदी अरेबिया पॅलेस्टिनी लोकांप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे आणि पॅलेस्टिनी राज्याच्या स्थापनेशिवाय इस्रायलसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारतो," 

इस्रायल-सौदी संबंध -ट्रम्प यांच्या सोबतच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत बोलताना इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, इस्रायल सौदी अरेबियाच्या सोबतीने यशस्वी प्रयत्न करेल. मात्र, ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेल्या गाझा युद्धानंतर, सौदी अरेबियाने इस्रायलसोबतचे संबंध सामान्य करण्याच्या प्रयत्नांना थंड बासनात टाकले आहे. तेव्हापासूनच अरब देशांच्या मनात इस्रायलच्या आक्रामक भूमिकेप्रति संताप आहे.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाAmericaअमेरिकाPalestineपॅलेस्टाइनIsraelइस्रायल