शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

इराण बेचिराख करू : ट्रम्पचा इशारा; तेहरानवर तुफान हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 05:17 IST

शरणागती पत्करण्यास इराणचा साफ नकार, हल्ल्यांवरून मागितली शेजाऱ्यांची माफी, लेबनॉन-इस्रायलमध्ये तुंबळ युद्ध, मिळेल त्या वाहनातून लोकांचे अन्यत्र स्थलांतर सुरू

वॉशिंग्टन/तेहरान : पश्चिम आशियातील परिस्थिती आता निर्णायक वळणावर पोहोचली असून इराणच्या काही भागांचा पूर्ण विनाश होईल असा हल्ला अमेरिका करणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला. हा हल्ला इतका विध्वंसक असेल की यात बळींची संख्या वाढेल व प्रदेशही उद्ध्वस्त होईल असे ट्रम्प यांनी विधान केले.

ट्रम्प यांची ही धमकी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्या इशाऱ्यानंतर आली. पेझेश्कियान यांनी शनिवारी सकाळी सरकारी दूरचित्रवाणीवरून, अमेरिकेची बिनशर्त शरणागतीची मागणी हे एक त्यांचे स्वप्न असून ते त्यांनी आपल्यासोबत थडग्यात घेऊन जावे, असे वक्तव्य केले. त्यांनी अमेरिकेशी कोणत्याही परिस्थितीत चर्चा शक्य नसल्याचेही स्पष्ट केले. यात शुक्रवारी अमेरिकेचे कोषागार सचिव स्कॉट बेसेंट यांनी या युद्धातील आतापर्यंतची सर्वात मोठी बॉम्बफेक होणे अजून बाकी आहे, असल्याचे विधान केले आहे.

आखाती देशांची मागितली माफी

पेझेश्कियान यांनी इराणकडून आखाती देशांवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल मात्र माफी मागितली. आखाती देशांवर झालेले हल्ले लष्करी पातळीवरील संवादातील अभावाने झाले असून, शेजारील देशांतून होणारे हल्ले थांबल्यास आमचेही थांबतील, असे म्हटले. मात्र, असे विधान येत असतानाच इराणने शनिवारी पहाटे बहरीन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या देशांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले.

तेहरानवर ८० विमानांतून हल्ले

शुक्रवारी रात्री आणि शनिवारी इस्रायलने इराणच्या अनेक प्रदेशांमध्ये तुफान हवाई हल्ले केले. यात ८० हून अधिक लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. तेहरानमध्ये मेहराबाद विमानतळावर केलेल्या हल्ल्यात भीषण आग लागल्याचे व्हिडिओ समोर आले असून तेहरानमध्ये अनेक भागांत भीषण स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. अनेक इमारती ध्वस्त झालेल्या दिसून आल्या.

५२,३६० भारतीय मायदेशी परतले 

मुंबई : युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांतील विमान सेवेवर मोठा परिणाम झालेला असला तरी आतापर्यंत तेथून ५२ हजार ३६० लोकांना भारतात परत आणण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे.

अडकलेल्या या लोकांना 

१८४ विमाने आणि ११ चार्टर विमानांतून मायदेशी परत आणण्यात आले आहे. ही आकडेवारी शुक्रवारपर्यंतची आहे. शनिवारी इराणने पुन्हा दुबई विमानतळाला लक्ष्य केल्यामुळे हे विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी कोणतेही विमान तेथून भारतात आले नाही.

इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये ४१ ठार 

पूर्व बेक्का खोऱ्यातील नबी चित या लेबनॉनमधील शहरावर इस्रायलने केलेल्या हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांमध्ये किमान ४१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर हिजबुल्लाहने शनिवारी उत्तर इस्रायलमधील किरयात शमोना आणि नाहारिया या शहरांतील रहिवाशांना हे भाग त्वरित सोडून जाण्याचा इशारा दिला आहे.

हिजबुल्लाहचा हा इशारा मिळाल्यानंतर लगेचच नाहारिया, किरयात शमोना आणि तिबेरियासच्या परिसरात धोक्याचे सायरन वाजू लागले. लेबनॉनच्या दक्षिण भागातील मोठे क्षेत्र आणि बैरूतच्या दक्षिण उपनगरांमध्ये इस्रायली सैन्याने लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश दिल्यानंतर हिजबुल्लाहने ही उलट चेतावणी दिली आहे.

दुबई आणि अबू धाबीमध्ये क्षेपणास्त्रांचे स्फोट

शनिवारी दुबईमध्ये पुन्हा इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले झाले. अबू धाबीमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी एकूण १६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती, त्यापैकी १५ हवेतच नष्ट करण्यात आली. तसेच १२१ ड्रोन पैकी ११९ ड्रोन पाडण्यात आले आहेत. दुबईतील एका "किरकोळ" घटनेत, हवेतच नष्ट केलेल्या क्षेपणास्त्राचे अवशेष (Debris) जमिनीवर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

हवाई वाहतूक विस्कळीत 

विमान सेवा पूर्ण पूर्ववत झालेली नाही. अनेक विमाने दुबई विमानतळावर उतरण्यासाठी हवेत घिरट्या घालताना दिसली. उड्डाणांना विलंब होत आहे.

स्थलांतर मोहीम 

हंगेरी, इटली, जर्मनी, बल्गेरिया आणि नेदरलँड्स यांसारखे अनेक देश आपल्या नागरिकांना यूएई आणि इस्रायलमधून शेजारील देशांच्या मदतीने बाहेर काढत आहेत. दुबई आणि अबू धाबीमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक असल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

इराणचे यूएई लक्ष्य

इराणच्या हल्ल्यांची सुरुवात झाल्यापासून यूएईने आतापर्यंत २२१ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे शोधली. त्यापैकी २०५ नष्ट करण्यात यश आले. १४ समुद्रात पडली आणि २ यूएईच्या भूमीवर पडली.

नागरिकांना अलर्ट   

दुबई व कतारमध्ये रहिवाशांना त्यांच्या मोबाइलवर इराणकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ला होणार असल्याचे धोक्याचे 'अलर्ट' दिले जात आहे. 

सौदी-पाकिस्तान चर्चा 

इराणचे हल्ले रोखण्यासाठी सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची रियाधमध्ये भेट झाली. त्यांनी इराणच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर सुरक्षा परिस्थितीवर चर्चा केली, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.

संरक्षण कराराच्या चौकटीत राहून हे हल्ले थांबवण्यासाठीच्या संयुक्त उपायांवरही या बैठकीत खल झाला. करारानुसार कुणा एकावरील हल्ला दोघांवरील हल्ला मानला जातो; पण सौदीवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे या कराराची सत्त्वपरीक्षा होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Threatens Iran Devastation; Tehran Hit by Airstrikes

Web Summary : Trump warned of devastating attacks on Iran, following Iranian threats. Airstrikes hit Tehran, causing explosions and damage. Thousands of Indians evacuated as regional tensions escalate, with attacks on multiple countries. Concerns rise over widespread conflict.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायलWarयुद्ध