शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी 'फादर ऑफ इंडिया'- डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 05:52 IST

ट्रम्प यांच्याकडून मोदींचं तोंडभरुन कौतुक

न्यूयॉर्क: पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. मोदी दहशतवादाच्या समस्येचा व्यवस्थित सामना करतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयनं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याची खळबळजनक कबुली इम्रान खान यांनी काल दिली. त्यावरुन ट्रम्प यांना पाकपुरस्कृत दहशतवादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर यामध्ये पंतप्रधान मोदी लक्ष घालतील. आम्ही दोन देश मिळून याचा सामना करू, असं ट्रम्प म्हणाले.  इस्लामिक दहशतवादाची समस्या दोन्ही देश एकत्र येऊन सोडवतील. दहशतवादाच्या मुद्द्यावर मोदींशी अतिशय मोकळेपणानं चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. भारत, पाकिस्तान राजी असल्यास काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं ट्रम्प काल म्हणाले होते. मात्र आज एक पाऊल मागे जात पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांनी हा प्रश्न सोडवल्यास ते उत्तम होईल, असा पवित्रा ट्रम्प यांनी घेतला. काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याची ठाम भूमिका भारतानं घेतल्यानं ट्रम्प यांनी सावध पवित्रा घेतल्याचं बोललं जात आहे.  यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचं तोंडभरुन कौतुक करत त्यांना 'फादर ऑफ इंडिया' म्हटलं. त्यांनी मोदींची तुलना अमेरिकन गायक आणि अभिनेते एल्विस प्रेस्लीसोबत केली. मोदी भारतात एल्विस प्रेस्लीसारखे लोकप्रिय आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमात मोदींनी दहशतवादाबद्दल घेतलेल्या भूमिकेचीही ट्रम्प यांनी प्रशंसा केली. दहशतवादाबद्दलची मोदींची भूमिका अतिशय कठोर होती आणि त्यांनी ती अतिशय स्पष्टपणे मांडली, असं ट्रम्प म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पTerrorismदहशतवादImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान