शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:16 IST

Asim Munir News: अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना मुनीर यांनी भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला जाईल, असा दावा केला आहे. तसेच काश्मीरबाबतही लवकरच चांगली बातमी येईल, अशी मुक्ताफळे उधळी आहेत. 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या हल्ल्याचा बदला घेतला होता. त्यानंतर पाकिस्ताननेभारताच्या आक्रमक कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानमधील ११ हवाई तळांना लक्ष्य केले होते. त्यामुळे अखेरीस पाकिस्तानला युद्धविरामाची विनवणी करणे भाग पडले होते. मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये नामुष्की ओढवल्यानंतरही पाकिस्तानकडून विविध मार्गांनी आगळीक सुरूच आहे. त्यात आता अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे फिल्ड मार्शन आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना मुनीर यांनी भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला जाईल, असा दावा केला आहे. तसेच काश्मीरबाबतही लवकरच चांगली बातमी येईल, अशी मुक्ताफळे उधळी आहेत. 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी भारताचे तुकडे करून १९७१ च्या पराभवाचा बदला घेण्याचा दावा केला आहे, अशी माहिती पाकिस्तानी पत्रकार अजाज सय्यद यांनी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात दिली आहे. तर आसिम मुनीर यांच्या भाषणावेळी तिथे उपस्थित असलेल्या नोमान मुगल यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही चीनसोबत मिळून भारताविरोधातील युद्ध लढलो, असे आसिम मुनीर म्हणाले. तसेच मुनीर यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहतवादी हल्ल्याला दहशतवादी हल्ला मानण्यास नकार दिला. 

यादरम्यान आसिम मुनीर यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारताविरोधात पाच आघाड्यांवर लढाई लढली. त्यात सायबर वॉरफेअरचाही समावेश होता. पाकिस्तानी सायबर हल्ल्यांनी ७० टक्क्यांपर्यंत ग्रिड स्टेशन हॅक झाली होती. तसेच ती बंद करण्यात आली होती. एवढंच नाही तर पाकिस्तानचे ड्रोन गुजरात आणि दिल्लीपर्यंत पोहोचले होते. एवढंच नाही तर भारताच्या रेल्वे नेटवर्कलाही हॅक करण्यात आल्याचा दावाही आसिम मुनीर यांनी केला. 

भारताबरोबर झालेल्या संघर्षामध्ये लढण्यासाठी पाकिस्तानला चीनकडून हत्यारे आणि लष्करी उपकरणे मिळाली होती. तसेच त्यांचा पाकिस्तानने ज्याप्रकारे वापर केला, ते पाहून चीनही प्रभावीत झाला, असा दावाही आसिम मुनीर यांनी केला आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर