शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

CoronaVirus News: कोरोना चौकशीला आमचा पाठिंबा, पण...; चीननं सांगितली महत्त्वाची अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 20:00 IST

अखेर चीनच्या अध्यक्षांनी मौन सोडले; मदतीचा आकडा जाहीर करून कोरोनाच्या चौकशीवर भाष्य

नवी दिल्ली: चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. याबद्दल चीनची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. चीनमधून पसरल्या कोरोना विषाणूबद्दल अद्याप अध्यक्ष शी जिनपिंग यांनी भाष्य केलं नव्हतं. अखेर जगभरातल्या कोरोना रुग्णांचा आकडा ५० लाखांच्या आसपास पोहोचला असताना जिनपिंग यांनी मौन सोडलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षित बैठकीत सहभागी झालेल्या जिनपिंग यांनी कोरोना संकटावर भाष्य केलं.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत आम्ही अतिशय पारदर्शकपणे आणि जबाबदारीनं काम केल्याचं जिनपिंग म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेला आणि संबंधित देशांना आम्ही योग्य वेळी कोरोनाबद्दलची माहिती दिली, असं जिनपिंग यांनी सांगितलं. वुहानमधून कोरोना पसरत असताना चीननं त्याबद्दलची माहिती लपवली. त्यामुळे इतर देशांना या संकटाचा सामना करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, असे आरोप चीनवर झाले आहेत. मात्र जिनपिंग यांनी या आरोपांचं खंडन केलं. कोरोनाबद्दलचा तपास करण्यासाठी ६२ देश एकत्र आले आहेत. यामध्ये भारताचादेखील समावेश आहे. या तपासाबद्दलही जिनपिंग यांनी भाष्य केलं. जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या कोरोना तपासाचं आम्ही समर्थन करतो. आम्ही यासाठी तयार आहोत. पण हा तपास निष्पक्ष आणि स्वतंत्र असायला हवा, असं जिनपिंग म्हणाले. कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी त्यांनी २ अब्ज डॉलरच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. कोरोनावरील पाच लसींवर चीनमध्ये काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. संपूर्ण जगाचा विचार करून आम्ही कोरोनावरील लसीवर काम करत आहोत. कोरोनावरील लस सगळ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल. विकसनशील देशांना ही लस मिळेल याची काळजी आम्ही घेऊ असं जिनपिंग म्हणाले.सद्यस्थितीत 'त्या' २० हजार कोटींच्या प्रकल्पाची गरजच काय?; ६० माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्रचीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्तीचीनमध्ये ऑक्टोबर महिन्यातच पसरला होता कोरोना; जागतिक स्पर्धेतील खेळाडूंचा धक्कादायक दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन