CoronaVirus: चीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 06:09 PM2020-05-18T18:09:00+5:302020-05-18T18:12:49+5:30

छत्तीसगडच्या गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठात संशोधन सुरू

china needs vegetables of chhattisgarh to fight corona by increasing immunity kkg | CoronaVirus: चीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्ती

CoronaVirus: चीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्ती

googlenewsNext

बिलासपूर: छत्तीसगडच्या गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या वनस्पती विभागात छत्तीसगडमधल्या ३६ भाज्यांवर संशोधन सुरू आहे. कोरोनाचा सामना करण्याची क्षमता १० भाज्यांमध्ये असल्याचं नुकत्याच झालेल्या संशोधनातून समोर आली आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक लोह, कर्बोदकं, प्रथिने आणि तंतूचं प्रमाण अतिशय जास्त असलेल्या भाज्यांवर संशोधन सुरू करण्यात आलं आहे. या भाज्यांना चीन, मलेशिया, तैवानमध्ये विशेष मागणी आहे. 

वनस्पती विभागाचे अध्यक्ष डॉ. अश्विनी दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली भाज्यांमधल्या रोगप्रतिकारशक्तीबद्दल संशोधन सुरू आहे. छत्तीसगडमध्ये मिळणाऱ्या जवळपास १० भाज्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असल्याची माहिती प्राथमिक संशोधनातून समोर आली आहे. या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असल्यानं त्यांच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.  

सीएमडी पदव्युत्तर महाविद्यालयाचे प्राध्यापक पी. एल. चंद्राकार भाज्यांवर बऱ्याच कालावधीपासून काम करत आहेत. या भाज्यांचं पेटंट लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता असल्याचं चंद्राकार म्हणाले. जांजगीर-चांपामध्ये वास्तव्यास असणाऱ्या दिनदयाळ यादव नावाच्या शेतकऱ्यानं इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाचतल्या संशोधकांच्या सहकार्यानं सर्व भाज्यांच्या पेटंटसाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे अर्जदेखील केला होता. 
 

Web Title: china needs vegetables of chhattisgarh to fight corona by increasing immunity kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.