शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike : दहशतवाद्यांचे मृतदेह आम्ही पाहिले, बालाकोटमधील काही स्थानिकांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 16:52 IST

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पहाटे जबरदस्त एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते.

इस्लामाबाद - भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पहाटे जबरदस्त एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र या कारवाईत नेमकी किती हानी झाली हे समोर येत नव्हते. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत जैशच्या तळावरील चार इमारती नष्ट झाल्याची माहिती समोर आली होता. भारतीय हवाईदलाच्या एअर स्ट्राइकनंतर घटनास्थळावरून सुमारे 35 दहशतवाद्यांचे मृतदेह अॅम्ब्युलन्समधून बाहेर आणण्यात आले. असा दावा काही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त फर्स्टपोस्टने दिले आहे.भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर बालाकोट येथील एअरस्ट्राइकबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात होती. तसेच घटनास्थळावर ठरावीक प्रसारमाध्यमांना नेऊन तिथे काहीच झाले नाही, असाही दावा करण्यात येत होता. मात्र एअर स्ट्राइकवेळी त्या परिसरात असलेल्यांकडून वेगळीच माहिती समोर येत असून, त्यातून पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस येत आहे. भारतीय हवाईदलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर काही वेळाने घटनास्थळावरून सुमारे 35 दहशतवाद्यांचे मृतदेह अॅम्ब्युलन्समधून बाहेर नेण्यात आले. या कारवाईत ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्यात काम केलेल्यांचाही समावेश आहे, असा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींनी ही माहिती ओळख उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे. एअर स्ट्राइकनंतर काही वेळातच स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र पाकिस्तानी सैन्याकडून तात्काळ हा परिसर बंद करण्यात आला. तसेच पोलिसांनाही घटनास्थळावर जाण्यास मनाई करण्यात आली. एअर स्ट्राइक झालेल्या ठिकाणची माहिती बाहेर पोहोचू नये म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडचे मोबाइलसुद्ध जप्त करण्यात आले होते, असा दावाही काही स्थानिक व्यक्तींनी केला.   

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारत