शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 00:06 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्याबद्दल एक मोठं विधान केलं आहे. ट्रम्प यांनी खामेनेई यांचं नाव थेट न घेता, 'सुप्रीम लीडर' असा उल्लेख करत एक महत्त्वपूर्ण पोस्ट केली आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्याबद्दल एक मोठं विधान केलं आहे. ट्रम्प यांनी खामेनेई यांचं नाव थेट न घेता, 'सुप्रीम लीडर' असा उल्लेख करत एक महत्त्वपूर्ण पोस्ट केली आहे.

ट्रम्प काय म्हणाले?

आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, "तथाकथित 'सुप्रीम लीडर' कुठे लपले आहेत हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. त्यांना सहज लक्ष्य करता येऊ शकतं, पण ते सध्या सुरक्षित आहेत. पण, आम्ही त्यांना मारणार नाही, किमान आता तरी नाही." मात्र, या विधानासोबतच त्यांनी इराणला कडक शब्दांत इशाराही दिला. "आम्हाला नागरिकांवर किंवा अमेरिकन सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत. आमचा संयम आता संपत चालला आहे," असं ट्रम्प यांनी बजावलं.

इराणने क्षेपणास्त्रे डागली, इस्रायलचा प्रत्युत्तर

ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर, इस्रायलने लगेचच अलर्ट जारी केला आहे की, इराणने त्यांच्यावर क्षेपणास्त्रे डागली आहेत. ही क्षेपणास्त्रे जॉर्डन, लेबनॉन आणि सीरियामार्गे इस्रायलच्या दिशेने येत असल्याचं सांगितलं जात आहे. 'द टाइम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) ने दावा केला आहे की, त्यांनी इराणमधील ७० पेक्षा जास्त एअर डिफेन्स सिस्टम आतापर्यंत उद्ध्वस्त केल्या आहेत.

आयडीएफनुसार, इस्रायली हवाई दलाने इराणमधील कारवाई सुरू केल्यापासून ७० हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्या आहेत. शुक्रवार (७ जून) सकाळच्या कारवाईच्या पहिल्या २४ तासांत ४० हून अधिक इराणी हवाई संरक्षण प्रणालींवर हल्ला करण्यात आला होता, तर त्यानंतर आणखी ३० प्रणालींना लक्ष्य करण्यात आलं.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचाही इशारा

इस्रायल-इराण युद्धाबद्दल अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वेंस यांनीही एक मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, "ट्रम्प इराणविरुद्ध पुढील कारवाईचा निर्णय घेऊ शकतात. ट्रम्प नेहमीच सांगत आले आहेत की, इराण युरेनियम समृद्ध करू शकत नाही आणि त्यांनी वारंवार म्हटलं आहे की हे दोनपैकी एका मार्गाने होईल - सोप्या मार्गाने किंवा दुसऱ्या मार्गाने." वेंस यांनी स्पष्ट केलं की, "इराणच्या युरेनियम संवर्धनाला थांबवण्यासाठी ट्रम्प यांना पुढील कारवाई करण्याची गरज आहे का, याचा निर्णय ते घेऊ शकतात. हा निर्णय राष्ट्रपतींचा असेल."

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध