शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:35 IST

खरे तर, पाकिस्तानकडे असलेल्या सर्व एफ-१६ लढाऊ विमानांची संपूर्ण माहिती अमेरिकेकडे आहे. अमेरिकन पथक त्यावर २४ तास लक्ष ठेवून असते. पाकिस्तानकडे सध्या सुमारे ७५ एफ-१६ लढाऊ विमाने आहेत...

भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचीलढाऊ विमाने पाडली, असा खुलासा भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी नुकताच केला. पाकिस्तानकडे अमेरिकेने दिलेली एफ-१६ लढाऊ विमानेही आहेत, ज्यांच्या संपूर्ण देखभाल आणि तांत्रिक मदतीसाठी अमेरिकेची एक टीम पाकिस्तानात राहते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडले गेले का? असा प्रश्न विचारला असता, 'आम्हाला माहिती नाही,' असे अमेरिकेने म्हटले आहे.

F-16 पडल्यासंदर्भात नेमकं काय म्हणालं अमेरिकन परराष्ट्र खातं? -एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, "तुम्ही पाकिस्तान सरकारला विचारा, त्यांची एफ-१६ लढाऊ विमाने पाडली गेली आहेत, की नाही...," असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. खरे तर, पाकिस्तानकडे असलेल्या सर्व एफ-१६ लढाऊ विमानांची संपूर्ण माहिती अमेरिकेकडे आहे. अमेरिकन पथक त्यावर २४ तास लक्ष ठेवून असते. अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एक खास करार झाला आहे, त्यानुसार, अमेरिकन पथक तेथे तैनात केले जाते. पाकिस्तानकडे सध्या सुमारे ७५ एफ-१६ लढाऊ विमाने आहेत. २०१९ मध्ये विंग कमांडर अभिनंदन यांनीही, आपल्या मिग-२१ च्या सहाय्याने एक एफ-१६ पाडले होते.

भारताने पाकिस्तानचे 5 फायटर जेट पाडले - हवाईदलप्रमुख ए.पी. सिंह शनिवारी (9 ऑगस्ट 2025)  बंगळुरूमध्ये आयोजित एअरचीफ मार्शल एल. एम. कात्रे व्याख्यानमालेदरम्यान बोलताना म्हणाले होते की, "भारताच्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानची ५ लढाऊ विमाने पाडली होती. यात एईडब्ल्यू अँड सी विमानाला तब्बल ३०० किलोमीटर अंतरावरून लक्ष्य करण्यात आले होते."

याशिवाय, "एस ४०० एअर डिफेन्स सिस्टिम अलिकडेच हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. तसेच या संपूर्ण कारवाईदरम्यान, ते गेमचेंजर ठरले. या एअर डिफेन्स सिस्टिममुळे पाकिस्तानी विमानांना भारताच्या हद्दीत प्रवेश करणे आणि लांब पल्ल्याचे ग्लाईड बॉम्ब फेकणे शक्य झाले नाही," असेही हवाईदलप्रमुखांनी यावेळी सांगितले होते.

टॅग्स :Americaअमेरिकाfighter jetलढाऊ विमानPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारत