अब्जाधीश एलन मस्क यांनी जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉजची जबाबदारी सांभाळली आहे तेव्हापासून टेस्लाच्या कार आणि शोरुमवर हल्ले होण्यास सुरुवात झाली आहे. मस्क यांच्या निर्णयांमुळे लाखो अमेरिकन लोकांची नोकरी गेली आहे, तसेच महागाई देखील वाढली आहे. ट्रम्प आणि मस्क यांनी असे काही निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे की यामुळे परदेशच नाहीत तर त्यांच्या देशातील लोकही त्रस्त झाले आहेत. याचा परिणाम मस्क यांच्या कंपनीची कार घेणाऱ्यांना भोगावा लागत आहे.
अनेक ठिकाणी टेस्लाच्या कारना आगी लावण्यात आल्या आहे, गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, काही ठिकाणी टेस्लाचे शोरुम तोडफोड करून टाकण्यात आले आहेत. यात मस्कचे नुकसान होत नसले तरी लोक आपला राग त्यांचे उत्पादन घेतलेल्या ग्राहकांवर काढू लागले आहेत. यामुळे अमेरिकेच्या रस्त्यांवर टेस्लाच्या कारवरील हल्ले वाचविण्यासाठी या कारवर मस्क वेडा व्हायच्या आधी घेतली असे लोक लिहू लागले आहेत.
अनेक टेस्ला मालक त्यांच्या कारवर अशाप्रकारचे स्टीकर लावत आहेत. 'ही कार आम्ही तेव्हा घेतली जेव्हा मस्क वेडा आहे हे आम्हाला माहिती नव्हते.', 'मला एक इलेक्ट्रीक कार हवी होती, माफ करा मित्रांनो' असे स्टीकर लागू लागले आहेत.
एका सोशल मीडिया युजरने त्याच्या पुढे जात असलेल्या टेस्ला कारचा फोटो काढून ही मजेशीर पोस्ट व्हायरल केली आहे. हा फोटो मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या जवळचा आहे. राजकीय हिंसाचाराचा अभ्यास करणारे समाजशास्त्रज्ञ रँडी ब्लाझॅक यांनी असोसिएटेड प्रेस (एपी) ला सांगितले की, "टेस्ला हे एक सोपे लक्ष्य आहे म्हणून लोक ईव्हीवर हल्ला करत आहेत. ही वाहने आमच्या रस्त्यावर फिरत आहेत, त्यांचे शोरूम आमच्या भागात उघडे आहेत. यामुळे लोक त्यावर आपला राग काढत आहेत. ''
अनेक टेस्ला मालकांनी त्यांच्या गाड्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यावर स्वस्तिक असे चिन्ह काढलेले आहे किंवा गाड्या जाणूनबुजून ओरखडे काढलेल्या आहेत.