मंगळवारी इराणमध्ये वीज निर्मिती केंद्र आणि उड्डाण पूल दिवस असेल, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. होती. त्याचाच पुनरुच्चार करत ट्रम्प यांनी एक विधान केले आहे, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. "इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती कदाचित उद्याची रात्र असू शकते", असे ट्रम्प म्हणाले आहेत.
सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी इराण पाडलेल्या एफ-१५ विमानाबद्दल आणि वाचवण्यात आलेल्या त्याच्या पायलटबद्दल माहिती दिली. याच वेळी ट्रम्प म्हणाले की, "संपूर्ण देशाला (इराण) एका रात्री नष्ट करू शकतो आणि ती रात्र कदाचित ती उद्याची रात्रही असू शकते."
अमेरिकेचे एफ-१५ हे लढाऊ विमान इराणने पाडले. त्यातील पायलट विमान पडण्यापूर्वीच बाहेर पडला होता. त्याला वाचवण्यात अमेरिकेला यश आले आहे. पायलटला वाचवताना अमेरिकेची आणखी दोन लष्करी हेलिकॉप्टर्स इराणने पाडली. पण, पायलटला वाचवण्याची ही मोहीम ऐतिहासिक असल्याचे ट्रम्प म्हणाले.
पायलटला परत आणण्यासाठी वाटेल ते करा
ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "मी लष्कराला आदेश दिले होते की, आपल्या जवानाला सुरक्षित आणण्यासाठी वाटले ते करा. या अति धोक्याच्या मोहिमेसाठी २१ अमेरिकन लष्करी विमाने तैनात करण्यात आली होती आणि ही मोहीम यशस्वी ठरली."
ट्रम्प यांनी सांगितला मोहिमेचा घटनाक्रम
ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "लष्कराच्या आजवर झालेल्या सर्वात मोठ्या, क्लिष्ट आणि थरारक अशा लष्करी शोध मोहिमेच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आपण आज येथे जमलो आहोत. युद्धाच्या काळात जेव्हा विमाने पाडली जातात, विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्या सामर्थ्यशाली आणि क्रूर गटाविरुद्ध लढत असता तेव्हा असे प्रयत्न करणे शक्य नसते. कारण एका व्यक्तीला वाचवण्यासाठी तुम्ही २०० जण तिथे पाठवता आणि अशा मोहिमांची इच्छा असूनही त्या सहसा आखल्या जात नाहीत. अशा परिस्थितीत त्या एक किंवा दोन वैमानिकांसोबत वाईट घटना घडतात."
"या वेळी आपण दोन जणांना वाचवले, असा प्रयत्न कदाचित यापूर्वी कधीही केला गेला नसेल; पण आम्ही तो केला. आमच्याकडे अफाट कौशल्य होते आणि मला वाटते नशिबानेही आम्हाला थोडी साथ दिली. आम्हाला अनेक चांगल्या लोकांनी मदत केली. या लष्करी बचाव मोहिमेत सहभागी होणे हा एक सन्मान होता. ही एक अत्यंत ऐतिहासिक घटना आहे. ही बचाव मोहीम इतिहासात नोंदवली जाईल", असा दावा ट्रम्प यांनी केला.
अशी कामगिरी यापूर्वी कोणीही पाहिलेली नाही
"गुरुवारी उशिरा रात्री, 'ऑपरेशन एपिक फ्युरी'द्वारे इराणमधील शत्रूच्या प्रदेशात एक अमेरिकन एफ-१५ लढाऊ विमान कोसळले होते. या ऑपरेशनमध्ये आपण अशा स्तरावर चमकदार कामगिरी करत आहोत, जी यापूर्वी कोणीही पाहिलेली नाही. संपूर्ण देशाला (इराणला) एका रात्रीत उद्ध्वस्त केले जाऊ शकते आणि ती रात्र कदाचित उद्याची रात्र असू शकते", असे विधान ट्रम्प यांनी केले.
रिपोर्टनुसार, प्रतिकुल आणि धोकादायक परिस्थिती ही मोहीम पूर्ण करण्यात आली. अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर इराणच्या हवाई हद्दीत शिरली आणि त्यांनी आपल्या पायलट्सचा शोध घेतला. अमेरिकेच्या बचाव मोहिमांपैकी ही एक मोहीम असल्याचे म्हटले जात आहे.
Web Summary : Trump warned Iran could be destroyed overnight, possibly tomorrow, referencing a downed US drone and rescued pilot. He praised the daring rescue mission involving 21 aircraft, emphasizing the historical significance and American military prowess.
Web Summary : ट्रंप ने ईरान को चेतावनी दी कि उसे रातोंरात तबाह किया जा सकता है, शायद कल ही। उन्होंने एक अमेरिकी ड्रोन गिराए जाने और पायलट को बचाने का जिक्र किया। उन्होंने 21 विमानों वाले साहसी बचाव मिशन की सराहना की।