शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:53 IST

तेहरान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी इराणने इस्रायली गुप्तचर संस्था अमान (Aman) आणि मोसाद (Mossad)च्या मुख्यालयांना निशाना बनवले.

इस्रायल आणि इराण यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून प्रचंड ताणले आहेत. या दोन्ही देशांत जबरदस्त बॉम्बिंग सुही आहे. यात आतापर्यंत 200 हून अधिक जणांचा बळी गेला असून शेकडो इमारतींचे नुकसान झाले आहे. यातच आज सोमवारी पहाटेच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) इराणने इस्रावर आणखी एक मिसाइल हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायली गुप्तचर संस्थांच्या मुख्यालयांना निशाणा बनवण्यात आले. 

तेहरान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी इराणने इस्रायली गुप्तचर संस्था अमान (Aman) आणि मोसाद (Mossad)च्या मुख्यालयांना निशाना बनवले. संबंधित वृत्तानुसार, रविवारी मध्यरात्री (स्थानीक वेळेनुसार) सुरू झालेल्या पहिल्या हल्ल्यानंतर, एका फॉल्स अलार्मने इस्रायली भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर, सोमवारी सकाळच्या सुमारास इराणने एक दुसरी मिसाइल वेव लॉन्च केली. हा हल्ला इस्रायलने कब्जा केलेल्या भागांवर करण्यात आला. हा हल्ला, सध्याच्या संघर्षाची सुरूवात झाल्यापासूनचा दहावा मोठा हल्ला आहे. 

माध्यमांतील वृ्त्तानुसार, इराणच्या निशाण्यावर ग्लीलोट येथील इस्रायली लष्कराची गुप्तचर संस्था 'अमान' (Aman)चे लॉजिस्टिक सेंटर होते. येथेच इस्रायली लष्करी गुप्तचर उपक्रम राबविले जातात. याशिवाय, मोसाद मुख्यालय  (Herzliya) आणि युनिट 8200 च्या काही बॅकअप ठिकाणेही नष्ट करण्यात आली आहेत. युनिट 8200 इस्रायलची इलेक्ट्रॉनिक पाळत आणि गुप्तचर संस्था आहे. जी साइबर वॉर आणि डेटा इंटेलिजन्सची तज्ज्ञ मानली जाते.

सामान्य घटना - या हल्ल्यात बस स्टँड अथवा पार्किंग क्षेत्राचे नुकसान झाल्याचे इस्रायली संरक्षण संस्थेचे म्हणणे आहे. मात्र, ही माहिती दिशाभूल करणारी असून प्रत्यक्षात हे हल्ले धोरणात्मक आणि गुप्तचर स्थानांना लक्ष्य करणारे होते, असे इराणी माध्यमांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध