पाकिस्तानच्या बालाकोट येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी एका दहशतवाद्याने, आपण पाकिस्तानसाठी दिल्लीविरुद्ध लढलो, असे म्हटले आहे. एढेच नाही, तर त्याने स्वतःला दहशतवादी मानण्यास नकार दिला आणि आपली तुलना पाकिस्तानी सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकाशी केली. या दहशतवाद्याचे नाव मसूद इलियास काश्मिरी असे आहे. तो जैश-ए-मोहम्मदमध्ये मोठ्या पदावर असलेला दहशतवादी आहे.
आपल्या भाषणात इलियासने मसूद अजहरचेही जबदस्त कौतुक केले. हा कार्यक्रम पैगंबर मोहम्मद यांचे जीवन आणि त्यांच्या शिकवणुकीसंदर्भात आयोजित करण्यात आला होता. मात्र, यावेळी भारतविरोधी आणि दहशतवादाला समर्थन देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. यावेली हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थित होते.
आपल्या भाषणात दहशतवादी मसूद इलियासने जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अजहरचे जोरदार कौतुक केले. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, इलियास म्हणाला, मसूद अजहर जगभरात एक उदाहरण आहे. अमेरिकेपासून रशियापर्यंत त्याची चर्चा होते. जैश-ए-मोहम्मद भारताविरुद्ध अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील आहे. यांपैकी एक हल्ला 2016 मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झाला होता. तर दुसरा दहशतवादी हल्ला जम्मू-काश्मीरमधील उरी येथील भारतीय सैन्याच्या छावणीवर झाला होता.
माध्यमांतील वृत्तांनुसार, इलियासने मसूद अजहरला दहशतवादी म्हणण्यावर आक्षेप घेतला. एवढेच नाही, तर पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादाला त्याने 25 वर्षांचा संघर्ष म्हटले आहे. इलियास पुढे म्हणाला, दहशतवाद स्वीकारून आम्ही पाकिस्तानच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी दिल्ली, काबूल आणि कंदहारशी लढलो. सर्व काही अर्पण केले. यानंतर 7 मे रोजी बहावलपूर येथे भारतीय सैन्याने जोरदार हल्ला करत मौलाना मसूद अजहरचे कुटुंब संपवले.
महत्वाचे म्हणजे, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल कारवाई करताना पाकिस्तानी सीमेतील अनेक दहशतवादी ठिकाणे नष्ट केली. यावेळी सीमेपलीकडील नऊ दहशतवादी ठिकाणे आणि प्रशिक्षण छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. यांत बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालयही होते.