सोशल मीडियाला आॅर्कुटचे बाय बाय

By Admin | Updated: July 2, 2014 03:54 IST2014-07-02T03:54:45+5:302014-07-02T03:54:45+5:30

वर्षानुवर्षे दुरावलेल्या प्रेमिकांना जवळ आणण्याचे काम करणाऱ्या आॅर्कुट या सोशल वेबसाईटची सद्दी संपत असून येत्या ३० सप्टेंबरला ही वेबसाईट बंद होणार आहे

By the way, | सोशल मीडियाला आॅर्कुटचे बाय बाय

सोशल मीडियाला आॅर्कुटचे बाय बाय

सॅनफ्रान्सिस्को : जगातील अनेक नवयुवकांना प्रेमाचा मधुर अनुभव देणाऱ्या तसेच जीवनाच्या जोडीदाराची आश्वासक साथ मिळवून देणाऱ्या आणि वर्षानुवर्षे दुरावलेल्या प्रेमिकांना जवळ आणण्याचे काम करणाऱ्या आॅर्कुट या सोशल वेबसाईटची सद्दी संपत असून येत्या ३० सप्टेंबरला ही वेबसाईट बंद होणार आहे. एकाअर्थी आॅर्कुटचा हा अखेरचा बाय बाय असेल. फेसबुक व टिष्ट्वटरच्या स्पर्धेत टिकाव न धरूशकल्यामुळे या वेबसाईटचे शटडाऊन होत आहे. आॅर्कुटने सोशल मीडियाची पायाभरणी केली आहे; पण यू ट्यूब, गुगल प्लस व ब्लॉगर यांना वाढता प्रतिसाद पाहून आॅर्कुट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे गुगलने सांगितले. या निर्णयानंतर आॅर्कुटने नवे यूजर्स स्वीकारण्याचे काम सोमवारपासून बंद केले आहे.


 

Web Title: By the way,