शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर मात करण्यासाठी हवेतील बाष्पातून पाणी जमा, युरोपातील अनोखा प्रयोग, जंगलातील हिरवाई टिकविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 10:01 IST

International News: प्रचंड उष्म्यामुळे स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल या देशांतील विशाल जंगलांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. युरोप, ब्रिटनमधील दुष्काळामुळे हजारो एकर जमिनीचे वाळवंटात रूपांतर होण्याची भीती आहे.

लिस्बन : प्रचंड उष्म्यामुळे स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल या देशांतील विशाल जंगलांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. युरोप, ब्रिटनमधील दुष्काळामुळे हजारो एकर जमिनीचे वाळवंटात रूपांतर होण्याची भीती आहे. त्यामुळे पोर्तुगाल, स्पेनसारख्या काही देशांत धुक्याच्या वेळी हवेतून बाष्प जमा करून त्यातील पाणी जंगलातील हिरवाई टिकविण्यासाठी सध्या वापरणे सुरू आहे.

युरोपीय महासंघात लाइफ निब्लस या योजनेद्वारे स्पेनमधील कॅनरी बेटातील ग्रेन कॅनरिया तसेच पोर्तुगाल येथे धुके व हवेतील बाष्प जमा केले जाते. धुक्याच्या वेळी जमिनीवर उभारलेल्या चौकोनी जाळीतून हवा प्रवाहित होते. तिच्यातील बाष्पामुळे पाण्याचा अंश जाळीवर जमा होतो. ते पाणी जाळीखाली असलेल्या कंटेनरमध्ये साठविण्यात येते. अशा प्रयोगासाठी गडद धुके व थोडी वेगाने वाहणारी हवा यांची आवश्यकता असते. ते वातावरण कॅनरी, पोर्तुगाल येथे पाहायला मिळते. (वृत्तसंस्था)

बाष्पातून मिळविणार दोन लाख लिटर पाणीग्रीन कॅनरियातील डोरामारा वनक्षेत्रात ३५ हेक्टर जमिनीवर २५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी धुके व हवेतील बाष्पातून दोन लाख लिटर पाणी साठविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.  

हे आहेत हिरवाई वाढविण्याचे उपायग्रेन कॅनरिया ते पोर्तुगाल या भागात ३१ फॉग वॉटर कलेक्टर बसविण्यात आले आहेत. ग्रेन कॅनरिया येथे धुक्यात हवेतील बाष्पाद्वारे ५४ हजार लिटर पाणी गेल्या काही दिवसांत जमा करण्यात आले आहे. जंगल टिकून राहावे, यासाठी १४ प्रकारची हजारो झाडे ग्रेन कॅनरिया ते पोर्तुगाल या भागात लावण्यात आली आहेत.

कोकुनचा आगळावेगळा प्रयोगधुक्याच्या वेळी हवेतील बाष्पातून पाणी मिळविण्यासोबत कोकुनचा प्रयोग केला जात आहे. रोपट्याच्या भोवती रिसायकल कार्डबोर्डपासून बनविलेले कोकुनचे आच्छादन लावण्यात येते. कोकुनमध्ये २५ लीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. कोकुनवरील लेपनामुळे आतील पाण्याचे बाष्पीकरण होत नाही. तसेच गुरा-ढोरांपासून रोपट्याला संरक्षण मिळते व ते नीट वाढू शकते.

टॅग्स :WaterपाणीInternationalआंतरराष्ट्रीय