शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

होर्मुझ सामुद्रधुनीवर युद्ध आणखी भडकणार; US-इस्रायलच्या मदतीसाठी 'या' देशानं पाठवली पाणबुडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 20:36 IST

आता HMS ANSON अरबी समुद्रातील उत्तरेकडून मोर्चा सांभाळेल जे होर्मुझ सामुद्रधुनी म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या अगदी जवळ आहे.

मध्य पूर्वेतील युद्धाला आज जवळपास ३ आठवडे होत आले आहेत तरीही हे युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत. परंतु हे युद्ध आणखी भडकण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सातत्याने इराणला धमकी देत आहेत. त्यातच ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी इराणविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, टॉमहॉक मिसाइलनं सज्ज आणि अणुऊर्जेने चालणारी एक ब्रिटीश पाणबुडी एचएमएस एनसन अरबी समुद्रात स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या जवळ पोहचली आहे. ब्रिटीश पाणबुडी अशावेळी या ठिकाणी पोहचली आहे जेव्हा राष्ट्रपती ट्रम्प यांनी इराणविरोधात सैन्य कारवाई आणखी तीव्र करण्याची धमकी देत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला ६ मार्च रोजी ब्रिटनची ही पाणबुडी ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरातून रवाना झाली होती. आता HMS ANSON अरबी समुद्रातील उत्तरेकडून मोर्चा सांभाळेल जे होर्मुझ सामुद्रधुनी म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या अगदी जवळ आहे.

कोणकोणत्या शस्त्रांनी सज्ज ब्रिटनची पाणबुडी?

ब्रिटनची ही अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी अनेक आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे. या शस्त्रांमध्ये १६०० किमी रेंजपर्यंत मारा करणारी टॉमहॉक ब्लॉक लँड अटॅक मिसाइल आणि स्पीयरफिश हॅवीवेट टॉरपिडोचा समावेश आहे. जी या पाणबुडीला अत्यंत मारक क्षमतेने खतरनाक बनवते.

इराणविरुद्ध युद्धात ब्रिटन होणार सक्रीय सहभागी

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अरबी समुद्रात ब्रिटिश पाणबुडीची तैनाती म्हणजे ब्रिटन आता इस्रायल आणि अमेरिकेसोबत इराणविरुद्धच्या युद्धात सक्रियपणे सहभागी होत आहे हे स्पष्ट दिसते. यापूर्वी ब्रिटनने अमेरिकेला इराणविरुद्ध ब्रिटिश लष्करी तळ वापरण्याची परवानगी दिली होती.

४८ तासांत ४ मोठे हल्ले 

मागील ४८ तासांत इराणने इस्रायलवर ४ मोठे हल्ले केले आहेत. त्यातील न्यूक्लियर रिसर्च सेंटरजवळील हल्ला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या हल्ल्यानंतर नेतन्याहू यांनी जगातील नेत्यांना थेट युद्धात उतरण्याचं आवाहन केले आहे. आता वेळ आलीय या लढाईत जगातील इतर देशांनी उघडपणे सहभागी व्हावे. अमेरिका, इस्रायल केवळ स्वत:साठी नव्हे तर जगासाठी ही लढाई लढत आहेत. इतर देश कधीपर्यंत वाट पाहणार आहेत असं नेतन्याहू यांनी म्हटलं.  

English
हिंदी सारांश
Web Title : Hormuz Strait Conflict Escalates: UK Submarine Deployed to Aid US, Israel.

Web Summary : Tensions rise in the Middle East as a British submarine, armed with Tomahawk missiles, deploys near the Strait of Hormuz. This move signals increased UK involvement alongside the US and Israel against Iran, following recent attacks and calls for global support.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणAmericaअमेरिका