झुकेरबर्गच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर युद्ध
By Admin | Updated: May 15, 2015 00:24 IST2015-05-15T00:24:42+5:302015-05-15T00:24:42+5:30
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनीच आपल्या पोस्टवर भारताचा नकाशा टाकताना चूक केली आणि सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान

झुकेरबर्गच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर युद्ध
नवी दिल्ली : फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनीच आपल्या पोस्टवर भारताचा नकाशा टाकताना चूक केली आणि सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धाची ठिणगी पडली. फेसबुक कॉमचे सीईओ असलेल्या झुकेरबर्ग यांनी त्यांचीच ब्रेनचाईल्ड मानल्या जाणाऱ्या ‘इंटरनेट आॅर्ग’ या साईटवर इन्फो- ग्राफिकमध्ये भारताचा उल्लेख करताना वापरलेल्या नकाशात जम्मू-काश्मीरचा न केलेला समावेश हे त्यामागचे कारण ठरले.
भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असतानाच काहींनी झुकेरबर्ग यांचे समर्थन करीत वादात तेल ओतले आहे. इन्फो- ग्राफिकमध्ये भारताचा उत्तर भाग दिसत नसल्याचे निदर्शनास येताच भारतीयांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडत झुकेरबर्ग यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ‘ग्रेट जॉब, प्लीज करेक्ट द इंडियन मॅप, काश्मीर इज मिसिंग ’ अशी प्रतिक्रिया अखिल देव यांनी दिली. त्यानंतर प्रतिक्रियांचा वर्षाव होत राहिला.
भारताचा नकाशा शेअर करताना तो चुकीचा तर नाही नां, याची खातरजमा करायला हवी होती. काश्मीर हे भारताचे राज्य असताना त्याला भारताचा भाग न दाखविणे खरोखर निराशाजनक आहे, असे अन्य एका प्रतिक्रियेत म्हटले आहे.