शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:46 IST

इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने भारतीय नाविक आणि नागरिकांसाठी सुरक्षा नियमावली जारी केली आहे.

इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून त्याचे पडसाद थेट समुद्रात उमटू लागले आहेत. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या भीषण हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने जागतिक तेल व्यापाराची नाडी मानली जाणारी होर्मुझ सामुद्रधुनी रोखून धरली आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय नाविक आणि जहाजांना मोठा धोका निर्माण झाला असून, भारत सरकारच्या 'शिपिंग डायरेक्टरेट जनरल'ने तातडीची सुरक्षा नियमावली जारी केली आहे.

नाविकांसाठी कडक सूचना "घरातच राहा..."

समुद्रात आणि किनाऱ्यावर असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सरकारने विशेष सूचना दिल्या आहेत, जे भारतीय सध्या इराण किंवा आसपासच्या बंदरांवर आहेत, त्यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. संवेदनशील भागांपासून दूर राहावे आणि कुठेही प्रवास करण्यापूर्वी भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा. जहाजांवर असलेल्या खलाशांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय किनाऱ्यावर उतरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्व भारतीयांना सरकारी अपडेट्सवर नजर ठेवण्यास आणि कंपनीच्या प्रतिनिधींशी सतत संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत विशेष हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

होर्मुझमध्ये अडकलीये जगाची रसद

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल टँकर्सच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. हिजबुल्लाहने देखील इशारा दिला आहे की, जर लेबनॉनला युद्धविराम करारात समाविष्ट केले नाही, तर हा करार मोडीत निघेल. यामुळे आखाती देशांतून होणारा तेलपुरवठा विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.

भारतीय नौदलाचा वॉच

युद्धाच्या सुरुवातीला या परिसरात भारताची २५ जहाजे होती, त्यापैकी ९ जहाजांनी सुरक्षितपणे होर्मुझ ओलांडले आहे. भारतीय नौदल गुरुग्राम येथील 'इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर'च्या माध्यमातून या परिसरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. हे केंद्र २८ देशांशी जोडलेले असून, जहाजांवरील हल्ल्यांची रिअल-टाइम माहिती मिळवण्यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Sea Conflict: India Issues Emergency Alert for Citizens

Web Summary : Amid escalating Iran-Israel tensions, India alerts citizens near Iranian ports. Avoid unnecessary travel; contact the embassy before moving. The Indian Navy monitors Hormuz Strait disruptions affecting global oil supply.
टॅग्स :IranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIndiaभारत