ग्रीसचे भवितव्य ठरविणाऱ्या सार्वमतासाठी मतदान
By Admin | Updated: July 5, 2015 23:08 IST2015-07-05T23:08:15+5:302015-07-05T23:08:15+5:30
ग्रीसमध्ये अटीतटीच्या वातावरणात सार्वमतासाठी मतदान घेण्यात आले असून, या मतदानाच्या निकालातून ग्रीकचे युरोझोनमधील भवितव्य ठरणार आहे असे पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास यांनी म्हटले आहे.

ग्रीसचे भवितव्य ठरविणाऱ्या सार्वमतासाठी मतदान
अथेन्स : ग्रीसमध्ये अटीतटीच्या वातावरणात सार्वमतासाठी मतदान घेण्यात आले असून, या मतदानाच्या निकालातून ग्रीकचे युरोझोनमधील भवितव्य ठरणार आहे असे पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास यांनी म्हटले आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला ग्रीस या आर्थिक संकटात कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.
नागरिकांची जगण्याची इच्छा, निर्धारपूर्वक जीवन जगण्याची इच्छा, तसेच देशाचे भवितव्य हाती घेणे कोणीही डावलू शकत नाही, असे सिप्रास म्हणाले. पांढराशुभ्र शर्ट घालून स्वत:चे मतदान करण्यासाठी आलेले सिप्रास मोकळे दिसत होते.
११ दशलक्ष ग्रीस नागरिकांना मतदान करण्यासाठी संपूर्ण देशात मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. एजियन बेटापासून ते उत्तरेकडील बल्गेरियाच्या सीमेवरील गावापर्यंत ही मतदान केंद्रे आहेत.
आंतरराष्ट्रीय दात्यांकडून आणखी निधी मिळवण्यासाठी कडक काटकसरीचे जीवनमान स्वीकारायचे काय? या प्रश्नाचे उत्तर मतांच्या माध्यमातून ग्रीकच्या नागरिकांना द्यायचे आहे.
युरोपियन युनियन व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार अगदी बारकाईने या सार्वमतावर लक्ष ठेवून आहेत.
सार्वमताचा निकाल नाही असा लागल्यास सरकार अधिक बळकट होईल. आंतरराष्ट्रीय कर्जदारांना थोडे कर्ज माफ करण्यास सांगू व काटकसरीचे उपाय बंद करू. काटकसर धोरणामुळे ग्रीसची अर्थव्यवस्था मंदीखाली गेली असून कोसळण्याच्या बेतात आहे. पण या सार्वमतातून हो किंवा नाही असा निकाल येण्याची शक्यता फार कमी आहे.
> या सार्वमतातून नकारात्मक निर्णय झाल्यास ग्रीसला १९ देशांच्या युरोझोन संघटनेतून बाहेर पडावे लागणार आहे; पण पंतप्रधान सिप्रास यांच्या मते ग्रीक नागरिक प्रतिष्ठेने जगण्यासाठी मतदान करत असून लोकशाही युरोपमध्ये सोमवारी नवा अध्याय सुरू होईल.