शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

उलट्या बोंबा ! 'मी दहशतवादी नाही, दहशतवादी यादीतून नाव काढा', हाफिज सईदची संयुक्त राष्ट्राकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 15:37 IST

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने दहशतवाद्यांच्या यादीतून आपलं नाव हटवण्यात यावं अशी मागणी संयुक्त राष्ट्राकडे केली आहे.

ठळक मुद्देदहशतवाद्यांच्या यादीतून आपलं नाव हटवण्यात येण्याची हाफिज सईदची मागणीहाफिज सईदने संयुक्त राष्ट्राकडे याचिका दाखल केली आहेगेल्याच आठवड्यात पाकिस्तानने 297 दिवसानंतर हाफिज सईदची घरकैदेतून सुटका केली आहे

इस्लामाबाद - मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने दहशतवाद्यांच्या यादीतून आपलं नाव हटवण्यात यावं अशी मागणी संयुक्त राष्ट्राकडे केली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीतून आपलं नाव वगळण्यात यावं यासाठी हाफिज सईदने संयुक्त राष्ट्राकडे याचिका दाखल केली आहे. हाफिज सईदने लाहोरमधील एका लॉ फर्मच्या माध्यमातून ही याचिका पाठवली आहे. हाफिज सईद घरकैदेत होता तेव्हाच ही याचिका करण्यात आली. 

संयुक्त राष्ट्राने  मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर डिसेंबर 2008 रोजी हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. मुंबई दहशतवादी हल्ल्यात एकूण 166 जणांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी कारवायांबद्दल हाफिज सईदवर 10 दशलक्ष डॉलरचे बक्षिस आहे. गेल्याच आठवड्यात पाकिस्तानने 297 दिवसानंतर हाफिज सईदची घरकैदेतून सुटका केली आहे. 

सुटकेनंतर पाकिस्तानमध्ये रात्रभर जश्न23 तारखेला गुरुवारी रात्री हाफिज सईदची लाहोरमधील आपल्या घरकैदेतून सुटका झाली तेव्हा हाफिज सईदने केक कापून आपलं स्वातंत्र्य साजरं केलं. इतकंच नाही, हाफिज सईदच्या स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा होत असताना, पाकिस्तान सरकारमधील अधिकारी हाफिज सईदचा साहेब म्हणून उल्लेख करत होते. मुंबई दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्ष पुर्ण होत असतानाच, हाफिज सईदची सुटका झाली. हाफिज सईदचं अभिनंदन करण्यासाठी जमात-उद-दावाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. सुटका झाल्यानंतर हाफिज सईदने समर्थकांसोबत आनंद साजरा केला. हाफिज सईदचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये हाफिज केक आणि मिठाई खाताना दिसत होता. 

सुटका झाल्यानंतर हाफिज सईदने भारताविरोधातील गरळ ओकली होती. त्याने काश्मीर मुद्द्यावरुनही भारताविरोधात गरल ओकली असून, काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढच राहणार असल्याचं सांगितलं होतं. भारत आणि अमेरिकेकडून दबाव टाकण्यात आल्यानेच आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप हाफिज सईदने केला. हाफिज सईदच्या भारताची चिंता मात्र वाढली आहे. पाकिस्तानकडून सुटका झाल्यामुळे हाफिज सईद पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातमी: निष्पाप भारतीयांचे बळी घेणारा दहशतवादी हाफीज सईदच्या सुटकेचे उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये सेलिब्रेशन 

मुंबई हल्ल्यातील अपराध्यांना शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करीत असलेल्या भारताला यामुळे धक्का बसला आहे. या वर्षी जानेवारीपासून सईद अटकेत होता. सईद याच्यावर त्याने केलेल्या दहशतवादी कारवायांबद्दल अमेरिकेने १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही जाहीर केलेले आहे. हाफीज सईदची स्थानबद्धता आणखी तीन महिन्यांनी वाढवावी ही सरकारची मागणी पंजाब प्रांताच्या न्यायालयीन आढावा मंडळाने फेटाळली. या मंडळात लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समावेश होता.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदterroristदहशतवादी