शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

'रेड स्क्वेअरचा आजारी म्हातारा'... युक्रेनच्या झेलेन्स्की यांनी रशियाच्या पुतीन यांची उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 14:06 IST

Volodymyr Zelenskyy vs Vladimir Putin: नवे युक्रेनियन ड्रोन क्षेपणास्त्र रशियावर युद्धात वरचढ ठरेल असा दावाही झेलेन्स्कीने केला.

Volodymyr Zelenskyy vs Vladimir Putin: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एका नवीन युक्रेनियन ड्रोन क्षेपणास्त्राबद्दल (Palianytsia) माहिती दिली. 'हे शस्त्र युद्धात रशियापेक्षा वरचढ ठरेल,' असा विश्वास झेलेन्स्की यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची खिल्ली उडवली आणि त्यांना 'रेड स्क्वेअरचा आजारी म्हातारा माणूस' (sick old man from red square) असे संबोधले. एकीकडे रशियासोबत युद्ध सुरु असताना, युक्रेनने शनिवारी ३३वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. यात बोलताना झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेन आतापर्यंत रशियाविरुद्ध वापरत असलेल्या देशांतर्गत बनवलेल्या ड्रोनपेक्षा पॅलियानिट्सिया हे नवीन शस्त्र खूपच वेगवान आणि अधिक शक्तिशाली आहे.

पुतीन यांची उडवली खिल्ली

झेलेन्स्कीने इशारा दिला की, युक्रेन जेव्हा प्रतिकार करतो त्यावेळी कशापद्धतीने युद्ध लढतो हे आता रशियाला समजेल. रशियामधील विविध टार्गेटवर यशस्वीरित्या हल्ला करण्यासाठी हे नवीन शस्त्र वापरले गेले आहे. पण या शस्त्राने कुठे कुठे हल्ले केले गेले, या जागांची माहिती झेलेन्स्की यांनी उघड केली नाही. उलट त्यांनी रशियाचे ७१ वर्षीय राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची खिल्ली उडवली. झेलेन्स्की म्हणाले, "रेड स्क्वेअरमधील आजारी म्हाताऱ्याच्या कोणत्याही धमक्यांचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही."

फेब्रुवारी २०२२ पासून युक्रेनवर हजारो क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करणाऱ्या रशियाने युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांना 'दहशतवादी कारवाया' असे संबोधले आहे. पुतीन यांचे सैन्य युक्रेनच्या पूर्व भागात कूच करत असून त्यांनी आतापर्यंत देशाचा सुमारे १८ टक्के भाग ताब्यात घेतला आहे. या साऱ्या कारवायांवर बोलताना झेलेन्स्की म्हणाले, "मला पुन्हा एकदा ठणकावून सांगायचे आहे की आमचे नवीन शस्त्रास्त्रांचे निर्णय, ज्यात पॅलिनिट्सियाचा समावेश आहे, हा आमचा युद्धात संघर्ष करण्याचा खरा मार्ग आहे. आमचे काही भागीदार निर्णय घेण्यास विलंब करत आहेत, पण आम्ही मागे हटत नाही," असेही झेलेन्स्की पत्रकार परिषदेत म्हणाले.

क्षेपणास्त्राला असे नाव का देण्यात आले?

'Palianytsia' हा युक्रेनियन प्रकारचा ब्रेड आहे. युक्रेनियन म्हणतात की हा शब्द रशियन लोकांना उच्चारणे फार कठीण आहे. ड्रोन क्षेपणास्त्राबाबत झेलेन्स्की म्हणाले, 'रशियाने त्यांच्यावर कशामुळे हल्ला केला हे सांगणे खूप कठीण जाईल.'

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनIndependence Dayस्वातंत्र्य दिन