शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 08:08 IST

Indonesia Volcano: हनिमून डेस्टीनेशन असलेल्या बालीतील विमान उड्डाणांवर झालाय परिणाम, वाचा सविस्तर

Indonesia Volcano: भारताच्या जवळच असलेल्या इंडोनेशिया देशातील माउंट लेवोटोबी लाकी येथे मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यामुळे राखेचे आणि धुराचे इतके मोठे ढग निर्माण झाले की आकाशात १० किलोमीटरपर्यंत काहीही दिसत नव्हते. या ज्वालामुखीत एकामागून एक अनेक स्फोट झाले. त्यानंतर रेड अलर्ट जारी करण्यात आला. धुराच्या या लोटांमुळे अनेक विमान उड्डाणे वळवण्यात आली आहेत.

ज्वालामुखीतून निघणाऱ्या धुराचा अंदाज १५० किमी अंतरावरूनही येऊ शकत होता इतका स्फोट मोठा होता. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर, अनेक लोकांना गावांमधून बाहेर स्थलांतरित करण्यात आले आणि अनेक विमान उड्डाणांमध्ये बदल करण्यात आले. हल्लीच्या तरूणाईमध्ये हानिमून डेस्टिनेशन म्हणून लोकप्रिय असलेल्या बालीकडे जाणारी आणि येणारी विमाने यात समाविष्ट आहेत.

रेड अलर्ट जारी

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. ज्वालामुखीच्या आजूबाजूच्या ८ किमी पर्यंतचा परिसर धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. राखेतून लहान दगड उडून पडत आहेत. त्याशिवाय गावांमध्येही राखेचा ढिगारा पडला आहे. नुरबेलेन गावातील परिस्थिती इतकी वाईट आहे की अनेक लोकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे.

ज्वालामुखीबद्दल...

माउंट लेवोटोबी लाकी इंडोनेशियातील फ्लोरेस तैमूर जिल्ह्यात आहे. ते माउंट लेवोटोबीच्या पेरुम्पुआनशी जोडलेले आहे. या ज्वालामुखीचा अनेक वेळा उद्रेक झाला आहे. नोव्हेंबरमध्येही त्याचा उद्रेक झाला होता, ज्यामध्ये ९ लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक लोक जखमी झाले होते. त्यानंतर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती. त्यानंतर मार्चमध्ये हा ज्वालामुखी पुन्हा सक्रिय झाला.

अनेक उड्डाणांवर परिणाम

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे फ्रान्सिस्को झेवियर सेडा विमानतळ बंद राहिले. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला. व्हर्जिन ऑस्ट्रेलिया, जेटस्टार आणि जुनेयाओ एअरलाइन्सच्या उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच बालीच्या आय गुश्ती नुग्रा राय आंतरराष्ट्रीय विमानतळावरचीही ३७ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाVolcanoज्वालामुखी