शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्लादिमीर पुतिन यांच्या गर्लफ्रेंडचं अफेअर, कोण आहे तो? युद्धादरम्यान रोमान्सची चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 20:13 IST

Vladimir Putin's girlfriend : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या राजकीय कारकीर्दीप्रमाणेच त्यांचं खासगी जीवनही तितकच रहस्यमय आणि वादळी आहे. आता त्यांचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या राजकीय कारकीर्दीप्रमाणेच त्यांचं खासगी जीवनही तितकच रहस्यमय आणि वादळी आहे. आता त्यांचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याचं झालंय असं की, पुतिन यांची कथित प्रेयसी अलिना काबेवा हिच्या अफेअरची चर्चा पाश्चात्य मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली आहे. डेली मिररने युक्रेनमधील प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने सांगितले की, पुतिन यांच्या गर्लफ्रेंडचं त्यांच्याच सिक्युरिटी गार्डसोबत अफेअर सुरू आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात गुंतल्याने व्लादिमीर पुतिन यांचं अलिनाकडे दुर्लक्ष होत आहे.  दरम्यान, चार मुलांसह स्वित्झर्लंडमध्ये राहत असलेली अलिना चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे.  अलिना हिच्या या चारही मुलांचे पिता हे व्लादिमीर पुतिन असल्याचं सांगितलं जात आहे. 

टेलिग्राम चॅन जनरल एसव्हीआरने दावा केला की, पुतिन यांच्या राजवाड्याच्या चार भिंतींमागे सारं काही आलबेल नाही आहे. युक्रेनी मीडिया आउटलेट ओबोजरेवाटेल.एडनुसार पुतिन यांना अलिनाच्या सुरू असलेल्या अफेअरबाबत सांगितलं आहे. मात्र त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. पुतिन यांना या बातम्यांमध्ये कुठलाही रस नसून, त्यांनी त्यांच्या कथित प्रेयसीचा प्रियकर कोण आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही. 

मॉस्कोस्थित एका वृत्तपत्राने पहिल्यांदा २००८ मध्ये दोघांच्या संबंधांबाबत पहिल्यांदा गौप्यस्फोट केला आहे. मात्र व्लादिमीर पुतिन आणि काबेवा या दोघांपैकी एकानेही या नात्याबाबत जाहीरपणे कबुली दिलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून पुतिन आणि काबेवा यांना मॉस्कोमधील राजकीय वर्तुळात अनेकदा पाहिले गेले आहे. त्यामुळे त्यांच्यातील संबंधांना दुजोरा मिळत होता. काबेवा ही निवृत्त जिमनॅस्ट आहे. तिने दोन ऑलिम्पिक पदके, १४ वर्ल्ड चॅम्पियनशिप पदके आणि २१ यूरोपियन चॅम्पियनशिप पदके पटकावली आहेत. जागतिक जिमनॅस्टिकमधील आघाडीच्या जिमनॅस्टपैकी एक आहेत.  

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाrelationshipरिलेशनशिप