शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

Vladimir Putin's Girlfriend Alina Kabaeva Pregnant: पुतीन हैराण! ७० व्या वर्षी बाप बनणार; गर्लफ्रेंड अलीना पुन्हा प्रेग्नंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 10:50 IST

Russian President Girlfriend Pregnant: अलीना आणि पुतीन यांच्याच संबंध असल्याचे पुतीन यांनी अद्याप स्वीकारलेले नाहीय. अलीना ही रशियाच्या एका मीडिया ग्रुपची सर्वेसर्वा आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष युक्रेन हातात येत नाहीय म्हणून त्रासलेले असताना आता ७० व्या वर्षी बाप बनणार असल्याच्या वृत्ताने पुरते हादरले आहेत. त्यांची कथित ३८ वर्षीय गर्लफ्रेंड अलीना कबाएवा पुन्हा गर्भवती राहिली आहे. माजी ऑलिंम्पिक जिम्नॅस्ट असलेल्या अलीनाला आधीच पुतीन यांच्यापासून झालेली दोन मुले आहेत. पुतीन यांना आणखी मुले नको होती, असा दावा काही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. 

रशियाचा न्यूज चॅनल जनरल एसवीआर टेलिग्रामने याबाबतचे वृत्त दिले आहे. अलीना पुन्हा गर्भवती असल्याचे म्हटले आहे. लाल चौकात विजय दिवसाच्या तयारीत असताना पुतीन यांना अलीना प्रेग्नंट असल्याचे कळविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पुतीन यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. अलीना गर्भवती राहिल्याचे पुतीन यांना आवडलेले नाही. त्यांना आणखी एक मुल नको होते, यामुळे ते नाखूश असल्याचे सांगितले जात आहे. 

अलीना आणि पुतीन यांच्याच संबंध असल्याचे पुतीन यांनी अद्याप स्वीकारलेले नाहीय. अलीना ही रशियाच्या एका मीडिया ग्रुपची सर्वेसर्वा आहे. ती सध्या स्वित्झरलँडमध्ये राहत असल्याचे सांगितले जात होते. एका वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार अलीनाला २०१५ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये आणि २०१९ मध्ये मॉस्कोमध्ये दोन मुले झाली होती. युक्रेन युद्धामुळे अलीनावर अमेरिकेने निर्बंध लादल्याचे वृत्त आहे. 

जिम्नॅस्टच्या खेळातून ती निवृत्त झाल्यावर राजकारणात आली होती. यानंतर ती पुतीन यांच्या युनायटेड रशिया पार्टीमधून खासदार झाली. अलीनाला गायिका व्हायचे होते, मात्र ती अपयशी ठरली. अलीना २००७ पासून वेगवेगळ्या महत्वाच्या पदांवरही राहिली आहे.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया