शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Vladimir Putin: बंडामुळे पुतिन यांच्या सामर्थ्यावर सवाल, वॅगनर प्रमुखांवर कारवाई न करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 07:56 IST

Vladimir Putin vs Prigozine: रशियातील वॅगनर या खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या दोन दशकांहून अधिक काळ असलेल्या सत्तेला आव्हान दिल्याने पुतीन यांच्या सामर्थ्यावर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मॉस्को - रशियातील वॅगनर या खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या दोन दशकांहून अधिक काळ असलेल्या सत्तेला आव्हान दिले खरे; पण दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर हद्दपार होण्यासाठी अचानक करार केल्यावर शनिवारी रात्रीच हे बंड थंड झाले. तथापि, पुतीन यांच्या सामर्थ्यावर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, तर या संक्षिप्त बंडाने रशियन सैन्यांमधील कमकुवतपणा उघड झाला.

बंडात भाग घेतलेल्या वॅगनर सैनिकांवर खटला चालविला जाणार नाही. जे सैनिक या बंडात सहभागी झाले नाहीत, त्यांना संरक्षण मंत्रालयाने कराराची ऑफर दिली. बेलारुसला जातील. विश्लेषकांना असे वाटते की, पुतिन यांच्यासाठी हा धोका आहे की त्यांच्याकडे कमकुवत म्हणून पाहिले जाईल. प्रिगोझिन यांच्याबाबत अमेरिकेलाही गुप्त माहिती मिळाली होती.

....आणि मोठा संघर्ष टळला-  येवगेती प्रिगोझिन यांच्या नेतृत्वाखालील वॅगनर गटाचे सैनिक रशियन शहरात रोस्तोव्ह ऑन-दोनपर्यंत पोहोचले, तसेच मॉस्कोच्या दिशेने शेकडो किलोमीटर पुढे जाऊ शकले.- याचवेळी रशियन सैन्याने रशियाच्या राजधानीचे रक्षण करण्यासाठी जोरदार मुसंडी मारली. त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडीत वॅगनरच्या प्रमुखांनी आपल्या सैनिकांना अचानक मार्ग बदलण्यास सांगितले.- त्यांनी आपल्या सैनिकांना मॉस्कोच्या दिशेने न जाण्याचे आणि रशियन नागरिकांचा रक्तपात टाळण्यासाठी युक्रेनमधील त्यांच्या तळांवर परत जाण्याचे आदेश दिले.येवगेनी प्रिगोझिन जाणार बेलारुसलाक्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी शनिवारी जाहीर केलेल्या करारानुसार, येवगेनी प्रिगोझिन हे शेजारच्या त्यांच्यावरील सशस्त्र बंडखोरीचे आरोप वगळले जातील. तथापि, रविवारी सकाळपर्यंत प्रिगोझिन बेलारूसमध्ये आल्याचे कोणतेही वृत्त नव्हते.

 

टॅग्स :russiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन