शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

PM मोदींना घाबरवले अथवा धमकावले जाऊ शकत नाही, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा केली प्रशंसा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 02:58 IST

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंड भरून प्रशंसा केली आहे...

भारत आणि रशिया यांच्यात अनेक दशकांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांना अनेक वेळा मदतीचा हातही दिला आहे. आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंड भरून प्रशंसा केली आहे. मोदींना घाबरवले अथवा धमकावले जाऊ शकत नाही, असे पुतिन यांनी म्हटले आहे.

युक्रेनमध्ये युद्ध सुरू असतानाही भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याचा उल्लेख करत पुतीन म्हणाले, मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की, रशिया आणि भारत यांच्यातील संबंध सर्वच क्षेत्रांत सातत्याने विकसित होत आहेत. याचे कारण म्हणजे, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे धोरण, असे पुतिन यांनी म्हटले आहे. ते सेंट पीटर्सबर्ग येथे 'रशिया कॉलिंग इन्व्हेस्टमेंट फोरम' मध्ये बोलत होते.

पुतिन म्हणाले, मी कल्पनाही करू शकत नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय हीत आणि भारतीय जनतेच्या विरोधात कुठलीही कारवाई करण्यासाठी अथवा निर्णय घेण्यासाठी घाबरवले, धमकावले अथवा भाग पाडले जाऊ शकते. मला माहीत आहे, त्यांच्यावर असा दबाव आहे. खरे तर, मी त्यांच्यासोबत यासंदर्भात कधीही बोलत नाही. केवळ बाहेरून बघत असतो, काय सुरू आहे ते. कधी कधी तर भारतीय लोकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील त्यांच्या कठोर भूमिकेचे मला आश्चर्यही वाटते. 

महत्वाचे म्हणजे, रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू झाल्यानंतर, अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांनी रशियावर कठोर निर्बंधही लादले होते. मात्र असे असतानाही, भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी केले आहे.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया