व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आला नाही, सध्या पूर्णपणे आहेत स्वस्थ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 02:07 PM2023-10-24T14:07:26+5:302023-10-24T14:09:19+5:30
डॉक्टरांनी त्यांना सीपीआर दिला आणि त्यानंतर ते शुद्धीवर आले, असा दावा टेलिग्राम वाहिनीने दावा केला होता.
गेल्या दोन दिवसांपासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हृदयविकाराच्या बातम्या येत आहेत. व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर ते आपल्या खोलीत जमिनीवर पडलेले आढळले. या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना उचलले, असे सांगितले जात आहे. दाव्यानुसार, व्लादिमीर पुतिन जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र एका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पूर्णपणे स्वस्थ आहेत आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला नाही.
रशियन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी ७१ वर्षीय व्लादिमीर पुतिन दिवसभर क्रेमलिनमध्ये आपली ऑफिशिलय ड्युटी करत होते. व्लादिमीर पुतिन यांनी काल संध्याकाळी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांशीही फोनवर चर्चा केली. तसेच, व्लादिमीर पुतिन यांनी रशियातील एका प्रदेशाच्या गव्हर्नरचीही भेट घेतली. यानंतर व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराच्या झटक्याची बातमी सर्वप्रथम टेलिग्राम चॅनल - जनरल एसव्हीआरवर देण्यात आली होती, जी खोटी आहे.
व्लादिमीर पुतिन यांना रविवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा जनरल एसव्हीआरने केला होता. व्लादिमीर पुतिन आपल्या हॉटेलच्या खोलीत बेडवरून जमिनीवर पडल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, त्यावेळी व्लादिमीर पुतिन जखमी झाले असून त्यांच्या नाकावर गंभीर जखमा दिसत होत्या, असाही दावा करण्यात आला होता. याचबरोबर, घटनेनंतर सुरक्षा कर्मचार्यांनी नंतर डॉक्टरांच्या टीमलाही बोलावले. डॉक्टरांनी त्यांना सीपीआर दिला आणि त्यानंतर ते शुद्धीवर आले, असा दावा टेलिग्राम वाहिनीने दावा केला होता.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, व्लादिमीर पुतिन यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जनरल एसव्हीआरच्या टेलिग्राम चॅनलवर एक मोठा लेख शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, मॉस्को टाईमनुसार रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी ते एका सुरक्षा रक्षकाला जमिनीवर पडलेले आढळले. सुरक्षा रक्षकांना त्यांचा पडण्याचा आवाज आला आणि ते त्यांच्या खोलीकडे पोहोचले, असे म्हटले जात आहे. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा केला जात आहे, पण सूत्रांनी हे सर्व दावे फेटाळून लावले असून व्लादिमीर पुतिन यांनी हृदयविकाराचा झटका आला नसल्याचे म्हटले आहे.