King Cobra Viral Video : साप पाहिला की प्रत्येकाचीच बोबडी वळते. अशातच जर साप विशालकाय आणि विषारी असेल तर आणखीच घाबरगुंडी उडू शकते. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका माणसाने किंग कोब्राला लोकरीची टोपी घातली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ साहबत आलम नावाच्या एका व्यक्तीने शेअर केला आहे. या व्हिडिओत तरुण सापासोबत राहून, त्याच्याशी चक्क मित्राप्रमाणे खेळताना दिसला आहे. तरुणाचा आणि टोपी घातलेल्या कोब्राचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तरुण किंग कोब्राशी खेळताना दिसला आहे. यामध्ये कोब्रा सापाच्या डोक्यावर छानशी टोपी देखील दिसली आहे. अगदी लहान बाळाला घातली जाते तशी लोकरीने विणलेली छोटीशी टोपी सापाला घातली आहे. या सापासोबत तरुण अगदी मित्रासारखा खेळत आहे. तर,साप देखील त्याच्या या खेळाला प्रतिसाद देत आहे. जंगलाच्या मधोमध कँपिंगचा आनंद घेत हे दोघेही धमाल करत आहेत. या व्हिडीओमध्ये अनेकदा असं वाटतं की, साप आता त्या तरुणाचा चावा घेईल. पण, तसे काहीही होत नाही.
नेटकऱ्यांना आलंय टेंशन!तरुणाचा आणि सापाचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी देखील भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहींनी दोघांच्या मैत्रीचे कौतुक केले आहे. तर, काही लोकांनी मात्र साप चावेल अशी भीती व्यक्त केली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, "कळत नाहीये कशी प्रतिक्रिया द्यावी. मला यांची भीती वाटली पाहिजे का? एखादा साप इतका गोंडस असू शकतो का? मीही थोड्या वेळासाठी गोंधळून गेलो होतो."
आणखी एकाने कमेंट करत लिहिले की, "हे मजेशीर आहे, पण खूप भयानक देखील आहे." "भाऊ मी कोब्रा आहे, मला घाबर", असं देखील एकाने म्हटलं आहे.