शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

विमान लँड होत होते,अचानक रनवेवर आले दुसरे विमान; वेळ साधत पायलटने वाचवले शेकडो प्रवाशांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:50 IST

पायलटने वेळीच निर्णय घेतल्यामुळे अमेरिकेतील शिकागोमध्ये एक मोठा विमान अपघात टळला.

अमेरिकेतील शिकागो मध्ये एक मोठा विमानअपघात घडला असता. पायटच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला. शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाचे लँडिंग सुरू होते, तेवढ्यात अचानक दुसरे विमान आले. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. पण, पायलटच्या सर्तकतेमुळे मोठा अपघात टळला. या दोन्ही विमानात मिळून शेकडो प्रवासी प्रवास करत होते. पायलटच्या एका निर्णयामुले या सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.

शिकागो विमानतळावर पायलटला धावपट्टीवर एक जेट विमान दिसले. हे विमान दिसताच पायलटने वेळ वाया न घालवता विमान पुन्हा एकदा आकाशात उडवले. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला. जेव्हा विमान पुन्हा हवेत झेपावले तेव्हा प्रवाशांनाही आश्चर्य वाटले. काही काळ विमानातील प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

'वाटेतला काटा' काढायला गेला, पण...; प्रेयसीच्या पतीला तलावात फेकताना प्रियकरही बुडाला! बार्शीतील घटना

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, सकाळी ९ वाजता साऊथवेस्टचे विमान अचानक थांबले. त्याचवेळी धावपट्टीवर एक जेट विमान रनवे पार करत होते.याबाबत आता विमान कंपनीकडून निवेदन आले आहे. साउथवेस्ट फ्लाइट २५०४ सुरक्षितपणे उतरले आहे, असं यात सांगण्यात आले आहे. दुसरे विमान धावपट्टीजवळ आल्यानंतर संभाव्य अपघात टाळण्यासाठी खबरदारी म्हणून क्रू पुन्हा उड्डाण केले. कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता प्रक्रियांचे पालन केले आणि विमान कोणत्याही अपघाताशिवाय उतरले. विमानातील संभाषणाचा एक ऑडिओ समोर आला आहे.

काही दिवसापूर्वीच अपघात झाला होता

काही दिवसापूर्वीच अमेरिकेत दोन विमान अपघात झाले होते. यामध्ये ६ फेब्रुवारी रोजी अलास्कामध्ये झालेल्या एका प्रवासी विमानाच्या अपघाताचा समावेश आहे. यामध्ये सर्व १० जणांचा मृत्यू झाला होता. २६ जानेवारी रोजी वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रीगन राष्ट्रीय विमानतळावर आर्मी हेलिकॉप्टर आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाची टक्कर झाली, यामध्ये दोन्ही विमानांमधील ६७ जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघात