विक्रम, एका माणसाच्या तेरा बायका एकाचवेळी प्रेगनेंट

By Admin | Updated: May 2, 2016 17:20 IST2016-05-02T17:20:27+5:302016-05-02T17:20:27+5:30

एखाद्या माणसाची दोन लग्न झाली असतील तर, त्याच्या दोन बायका एकाचवेळी गर्भवती रहाण्याचा योगायोग जुऴून येऊ शकतो.

Vikram, one man's wife and her husband at the same time | विक्रम, एका माणसाच्या तेरा बायका एकाचवेळी प्रेगनेंट

विक्रम, एका माणसाच्या तेरा बायका एकाचवेळी प्रेगनेंट

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. २ - एखाद्या माणसाची दोन लग्न झाली असतील तर, त्याच्या दोन बायका एकाचवेळी गर्भवती रहाण्याचा योगायोग जुऴून येऊ शकतो. पण एका व्यक्तीच्या तेरा बायका एकाचवेळी गर्भवती असतील तर ?. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार वरील छायाचित्रातील माणसाची तेरा लग्न झाली असून, त्याच्या सर्व बायका एकाचवेळी त्याच्यापासून गर्भवती राहिल्या आहेत. हा एक विक्रमच आहे. 
 
एका नव-याच्या दोन बायकांमध्ये समजूतदारपणाचा गुण अभावानेच आढळतो.  एका पत्नीला दुस-या पत्नीबद्दल असूया, इर्षा वाटते. पण इथे या माणसाच्या सर्व बायका गुण्यागोविंदाने परस्परांशी जुळवून घेत आहेत. उलट त्यांना आपल्या नव-याबद्दल अभिमान आहे. यातील एक बाई दुसरीबद्दल बोलताना भरभरुन बोलते.
 
ज्या देशातील ही व्यक्ती आहे तिथे तेरा विवाह कायदेशीर आहेत. पण हा जगातील पहिलाच माणूस असावा ज्याच्या सर्व बायका एकाचवेळी गर्भवती आहेत. या तेरा बायकांच्या प्रेगनन्सीमध्ये तीन ते पाच आठवडयांचे अंतर आहे. 
 
बातमी स्त्रोत फेसबुक

Web Title: Vikram, one man's wife and her husband at the same time