शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
4
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
5
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
7
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
8
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
9
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
10
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
11
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
12
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
13
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
14
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
15
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
16
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
17
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
18
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
19
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
20
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
Daily Top 2Weekly Top 5

विजय माल्याचं प्रत्यार्पण लांबणीवर, 2 एप्रिलपर्यंत वाढवला जामीन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 11:18 IST

भारतीय बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय माल्याचे प्रत्यार्पण आणखी लांबणीवर पडले आहे.  

लंडन  -  भारतीय बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय माल्याचे प्रत्यार्पण आणखी लांबणीवर पडले आहे.  गुरुवारी याप्रकरणी लंडनमधील वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर झालेली सुनावणी पूर्ण होऊ न शकल्यानं माल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यान, कोर्टाने माल्याला दिलासा दिला असून त्याच्या जामीन 2 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. 

भारत सरकारने माल्याविरोधात सादर केलेल्या पुराव्यांवर आक्षेप घेत युक्तीवाद करण्याची मागणी त्याच्या वकिलांनी वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात केली होती. त्यासाठी प्रत्यक्ष माल्यादेखील कोर्टात हजर होता. मात्र, यावेळी बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण होऊ शकला नाही. दरम्यान, त्यांनी भारत सरकारची याचिका रद्द करण्याची मागणी कोर्टात केली. ही सुनावणी या प्रकरणातील अंतिम सुनावणींपैकी एक ठरण्याची शक्यता होती. मात्र, ती पूर्ण होऊ न शकल्याने आता आणखी वाट पहावी लागणार आहे.

कोर्टात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रिटनची क्राऊन प्रॉसिक्यूशन सर्विस (सीपीएस) ने माल्याविरोधात पुरावे सादर करीत आपला युक्तीवाद सुरु केला. भारत सरकारकडे माल्याविरोधात खटला उभा करण्यासाठीच्या प्राथमिक पुराव्यांची कमतरता असल्याचा दावा बचाव पक्षाने केला होता. हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न कोर्टात सीपीएसने भारताच्यावतीने केला. दरम्यान, कोर्टात इतरही खटले सुरु असल्याने तसेच माल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणात पुढील सुनावणीची तारीखदेखील निश्चित होऊ शकली नाही.  

त्यामुळे आता या प्रकरणात बचाव आणि याचिकाकर्ते मिळून पुढील तीन महिन्यांत पुन्हा सुनावणीसाठी एक तारीख निश्चित करतील. सीपीएसने सादर केलेले पुरावे हे भारत-ब्रिटन यांच्यातील गुन्हेगार प्रत्यार्पण करारानुसार अनुकूल नसल्याचा दावा माल्याच्या वकिलांनी केला.  माल्याचं पलायन - मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. विजय माल्याला देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 17 सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय माल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याLondonलंडन