शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्याला झटका; दीर्घ लढाईनंतर भारतीय बँकांचा विजय, ब्रिटनमधील मालमत्ता जप्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 21:26 IST

फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली विजय मल्ल्याला भारतात फरार घोषित करण्यात आले आहे.

फरार उद्योगपती विजय मल्ल्या याला मोठा धक्का बसला आहे. एसबीआयच्या नेतृत्वाखालील भारतीय बँकांच्या एका संघाने मल्ल्याविरुद्ध यूकेमध्ये दिवाळखोरीचा आदेश कायम ठेवण्यासाठी न्यायालयीन खटला जिंकला. अशाप्रकारे, भारतीय बँकांना दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईत मोठा विजय मिळाला आहे. किंगफिशर एअरलाइन्सवरील थकीत कर्जाची परतफेड करण्याची मागणी भारतीय बँका करत आहेत.

भारतीय बँकांनी मल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्यासाठी ब्रिटनच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती जेणेकरून ते त्याच्या ब्रिटनमधील मालमत्तेवरून कर्ज वसूल करू शकतील. आता ब्रिटिश न्यायालयाने भारतीय बँकांच्या बाजूने निकाल दिला आहे. लंडन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अँथनी मान यांनी भारतीय बँकांच्या बाजूने निकाल दिला. तर विजय मल्ल्या याने दाखल केलेल्या अपीलची परवानगी मागणारे दोन अर्ज फेटाळण्यात आले. 

बँकांसाठी महत्त्वाचा निर्णयभारतीय बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कायदा फर्म टीएलटी एलएलपीने म्हटले की, या निकालामुळे बँकांना मल्ल्याच्या मालमत्तेवर कोणतेही संरक्षण नसल्याचे आणि दिवाळखोरीची याचिका वैध असल्याचे पुष्टी मिळाली आहे. टीएलटी एलएलपीचे कायदेशीर संचालक निक कर्लिंग म्हणाले, बँकांसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. मल्ल्याविरुद्ध मिळालेल्या 1.12 अब्ज पौंडाच्या डीआरटी (कर्ज वसुली न्यायाधिकरण) निकालासंदर्भात 2017 पासून बँकांसाठी काम करत असल्याने टीएलटीला हा निकाल मिळाल्याबद्दल आनंद आहे.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याBank of Indiaबँक ऑफ इंडियाBanking Sectorबँकिंग क्षेत्र