शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनमधील या गावातील लोकांसाठी हिरो आहे विजय मल्ल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 11:32 IST

ब्रिटनमधील टेविन गावात राहणा-या अब्जाधीश कुटंबांचं विजय मल्ल्या यांचं भारतात प्रत्यार्पण केलं जाऊ नये असं म्हणणं आहे. येथील लोकांसाठी विजय मल्ल्या एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही.

टेविन (युके) - भारताने याचवर्षी जून महिन्यात भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या विजय मल्ल्या यांना फरार घोषित केलं आहे. मल्ल्या यांन लवकरात लवकर भारतात आणून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी भारतीयांची इच्छा आहे. पण ब्रिटनमधील टेविन गावात राहणा-या अब्जाधीश कुटंबांचं मात्र विजय मल्ल्या यांचं भारतात प्रत्यार्पण केलं जाऊ नये असं म्हणणं आहे. लंडनपासून जवळपास 48 किमी अंतरावर असणा-या या गावातच विजय मल्ल्याचं घर आहे. येथील लोकांसाठी विजय मल्ल्या एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही.

विजय मल्ल्या यांच्यावर 17 बँकांचं 9000 कोटींचं कर्ज थकवल्याचा आरोप आहे. हे कर्ज विजय मल्ल्यांनी बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्ससाठी घेतलं होतं. विजय मल्ल्या यांच्यावर पैशांची अफरातफर केल्याचा गुन्हाही दाखल आहे. विजय मल्ल्या यांनी नुकतंच जवळपास दोन हजार घरं असलेल्या या गावाला एक ख्रिस्मस ट्री खरेदी करुन दिला आहे. ज्यानंतर येथील लोकांच्या मनात विजय मल्ल्यांनी घर केलं असून, त्यांच्यासाठी सन्मान वाढला आहे. 

क्राऊन पबमधील बारमॅनने सांगितलं आहे की, 'विजय मल्ल्या आमच्या गावासाठी मोठी संपत्ती आहे. अशी व्यक्ती आमच्या येथे आहे याचा आम्हाला आनंद आहे. ते फॉर्म्यूला वनशी जोडलेले आहेत हे आम्हाला खूपच प्रभावित करणारं आहे'. पुढे बोलताना त्याने सांगितलं की, 'विजय मल्ल्या एखाद्या अडचणीत आहेत याबद्दल येथील लोकांना माहिती आहे. पण अनेक श्रीमंत लोक कोणत्या ना कोणत्या तरी अडचणीत असतातच. त्यांचं प्रत्यार्पण केलं जाऊ नये अशी आम्हाला आशा आहे. त्यांनी येथेच राहू द्यावं. ते आमच्या पबमध्ये येत राहोत'. 

कंट्री बंपकीन कॅफेच्या आचा-याने सांगितलं की, 'विजय मल्ल्या जमिनीशी जोडलेले आहेत. ते नेहमी आपली पत्नी आणि मुलांसोबत येथे येत असतात. ते श्रीमंतांप्रमाणे कोणताही देखावा करत नाहीत. मला माहितीये की, भारत सरकार त्यांचा शोध घेत आहे, पण आम्हाला त्याची काळजी नाही. जगा आणि जगू द्या'.

मल्ल्यांचं पलायन - मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती. 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या