VIDEO- 'आयफोन-7'ची खिल्ली उडवणारा व्हिडीओ झाला व्हायरल
By Admin | Updated: September 9, 2016 17:36 IST2016-09-09T17:29:51+5:302016-09-09T17:36:44+5:30
जुन्या आयफोनच्या तुलनेत नवा आयफोन बराच अपग्रेड करण्यात आला आहे. मात्र यामधील अनेक फिचर्स हे आयफोनसाठी जरी नवे असले तरी

VIDEO- 'आयफोन-7'ची खिल्ली उडवणारा व्हिडीओ झाला व्हायरल
-ऑनलाइन लोकमत
अॅपलचा बहुप्रतीक्षित आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस दोन दिवसांपूर्वीच लॉन्च झाला. लॉन्चिंगनंतर या फोनबद्दल निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. जुन्या आयफोनच्या तुलनेत नवा आयफोन बराच अपग्रेड करण्यात आला आहे. मात्र यामधील अनेक फिचर्स हे आयफोनसाठी जरी नवे असले तरी अन्य ब्रॅन्ड्सच्या स्मार्टफोन्समध्ये ते फिचर्स आधिपासूनच उपलब्ध आहेत.
वॉटरप्रुफींग आणि ड्युअल कॅमेरा सेटअप हे दोन फिचर्स आयफोनमध्ये पहिल्यांदाच देण्यात आले आहेत. मात्र, सॅमस्ंग, सोनी आणि एलजी सारख्या कंपन्यांनी याआधीच हे फिचर्स असलेले फोन बाजारात उतरवलेले आहेत. त्यामुळे आयफोन 7 च्या लॉन्चिंगबाबत बरीच खिल्ली उडवली जात आहे. आयफोनची खिल्ली उडवणारा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.