VIDEO : 2 वर्षाच्या चिमुरड्याने वाचवला जुळ्या भावाचा जीव

By Admin | Updated: January 4, 2017 13:43 IST2017-01-04T13:43:06+5:302017-01-04T13:43:06+5:30

अमेरिकेतील युताह येथे एका दोन वर्षाच्या चिमुरड्याने आपल्या जुळ्या भावाचा जीव वाचवल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे

VIDEO: Two-year-old girl saved the twin brother's life | VIDEO : 2 वर्षाच्या चिमुरड्याने वाचवला जुळ्या भावाचा जीव

VIDEO : 2 वर्षाच्या चिमुरड्याने वाचवला जुळ्या भावाचा जीव

>ऑनलाइन लोकमत
युताह, दि. 4 - अमेरिकेतील युताह येथे एका दोन वर्षाच्या चिमुरड्याने आपल्या जुळ्या भावाचा जीव वाचवल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. दोघे भाऊ घरात खेळत असताना ड्रेसिंग टेबल अंगावर पडल्याने एकजण त्याच्या खाली अडकला होता. घटना घडली तेव्हा तिथे दुसरं कोणीच उपस्थित नव्हतं. शेवटी त्या दोन वर्षाच्या चिमुरड्याने ड्रेसिंग टेबल बाजूला ढकलत आपल्या भावाचा जीव वाचवला. ही सर्व घटना घरातील सेक्युरिटी कॅमे-यात कैद झाली आहे. 
 
रविवारी हे दोघे जुळे भाऊ ब्रॉक आणि बाऊडी यांचे वडिल रिकी शॉफ यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दोघे भाऊ घरात खेळताना दिसत आहेत. खेळताना एक भाऊ ड्रेसिंग टेबलवर चढण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र तोल गेल्याने टेबल त्याच्या अंगावर पडतं. यावेळी त्यांचे आई वडिल दुस-या खोलीत असल्याने त्यांना काहीच कळलं नाही. सेक्युरिटी कॅमे-यात पाहिल्यानंतर ही घटना घडल्याचं लक्षात आलं. 
 

Web Title: VIDEO: Two-year-old girl saved the twin brother's life